राणा वाद माझ्याकडून संपला : बच्चू कडू

आमदार रवी राणा यांच्यासोबतचा वाद आपल्याकडून संपला आहे; बच्चू कडून
MLA Bacchu Kadu
MLA Bacchu Kadu

नागपूर : ‘‘आमदार रवी राणा यांच्यासोबतचा वाद आपल्याकडून संपला आहे. आता तुम्ही सुद्धा चांगल्या बातम्या द्या,’’ असे आमदार बच्चू कडून यांनी गुरुवारी स्पष्ट करीत खोक्यांच्या वादाचे खापर मीडियावर फोडले.

राणा आणि बच्चू कडू यांच्यात ‘खोक्या’वरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेवटी या वादावर बोलावे लागले. त्यानंतर राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. कडू यांनी दुसऱ्या दिवशी सभा घेऊन वाद संपल्याचे जाहीर करतानाच अमरावतीचा पुढचा खासदार ‘प्रहार’चा राहील असे सांगून अप्रत्यक्षपणे राणा यांना डिवचले होते. राणा यांनीही कडू कसे निवडून येतात हे बघतोच असे वक्तव्य केल्याने पुन्हा वाद भडकणार असे वाटत होते.

नागपूर विमानतळावर आज बोलताना कडू यांनी या वादाला मीडियाला जबाबदार धरले. ते म्हणाले, ‘‘हा विषय आता मीडियाने थांबवला पाहिजे, ही माझी आग्रहाची विनंती आहे. मी सामान्य माणसासाठी काम करणार आहे हे सभेत बोललो ते तुम्ही दाखवले नाही. चांगल्या गोष्टी मीडियात येत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माझ्या मतदारसंघातील प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे.’’

वादाशी माझा संबंध नाही : नवनीत राणा

आमदार रवी राणा यांच्या पत्नी व खासदार नवनीत राणा यांनी मात्र या वादावर उघडपणे बोलणे टाळले आहे. मुंबईला जाण्यासाठी नागपूर विमानतळावर आल्या असता माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या, की देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ते जे सांगतात, ते आम्ही करतो. कडू आणि राणा यांच्या वादाशी माझा संबंध नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com