...अन् गळफास लावलेल्या आईचे पाय पकडून चिमुकली होती रडत

...अन् गळफास लावलेल्या आईचे पाय पकडून चिमुकली होती रडत

नागपूर : चिमुकलीचा पहिला वाढदिवस (small girl first birthday)... घरात आनंदाचे वातावरण... जवळच्या नातेवाइकांना वाढदिवसाचे निमंत्रण मिळाले... मोठ्या आनंदात पहिलावहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. केक कापला... नातेवाइकांना मुलीला गीफ्ट दिले. रात्री सगळ्यांनी जेवण केले. यानंतर घरी थांबलेले नातेवाईक झोपले. मध्यरात्री घटलेला प्रसंग पाहून सर्वच स्तभ झाले (Mother commits suicide) आणि हळहळ व्यक्त करू लागले. (Mother-commits-suicide-by-celebrating-daughter's-birthday)

सोनाली चित्तारी (वय २७) हिचे दोन वर्षांअगोदर नागेश चित्तारीसोबत लग्न झाले होते. पती नागेश हा फ्लॅक्स बोर्ड तयार करण्याचे काम करतो. सोनालीचे वडील अरुण सहारे हे ग्रामीण पोलिस विभागात नोकरीवर आहे. दोघांचा सुखी संसार सुरू होता. दोघांच्याही संसारवेलीवर चिमुकलीच्या रूपाने फूल उगवले. पाहता पाहता ती वर्षभराची झाली. यामुळे कुटुंबीयांनी बुधवारी मोठ्या थाटात तिचा वाढदिवस करण्याचा निर्णय घेतला.

...अन् गळफास लावलेल्या आईचे पाय पकडून चिमुकली होती रडत
पत्नी उच्चशिक्षित असेल तरीही पोटगी द्या : उच्च न्यायालय

पहिला वहिल्या वाढदिवसासाठी आई-वडिलांनी चांगले नियोजन केले. पाहुण्यांना निमंत्रण देऊन आमंत्रित केले. सर्व कार्यक्रमाला हजरही झाले. पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या धडाक्यात वाढदिवस साजरा झाला. यानंतर सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जवळचे पाहुणे रात्री सोनालीच्या वडिलांकडे झोपले. मात्र, रात्री दोन वाजता सोनाली चिमुकलीला घेऊन घरी गेली आणि गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि गुन्हा दाखल केला. तसेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

भेट घ्यायला गेले अन्...

बुधवारी थाटात वाढदिवस साजरा केल्यानंतर नातेवाईक सोनालीच्या वडिलांकडे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी घरी जाण्यापूर्वी त्यांनी सोनालीची भेट घेण्याचे ठरवले. मात्र, ती आपल्या घरी गेल्याचे त्यांना समजले. गुरुवारी सकाळी नातेवाईक अरुण यांच्यासह सोनालीच्या घरी गेले. त्यांनी आवाज दिल्यानंतरही सोनालीकडून प्रतिसाद मिळाला नाही. वेळ दार ठोठावल्यानंतर धक्का मारून दार तोडले असता सोनाली लटकलेल्या स्थितीत दिसली.

...अन् गळफास लावलेल्या आईचे पाय पकडून चिमुकली होती रडत
विदर्भ ते थेट लंडन, शेतकरी पुत्राची ६३ हजार विद्यार्थ्यांमधून निवड

दोन वर्षांपूर्वी आले होते भरत टाउनमध्ये राहायला

नागेश आणि सोनाली यांनी लग्न केल्यानंतर दोन वर्षांनी भरत टाउन येथे सोनालीच्या वडिलांच्या घरामागे भाड्याने राहायला आले होते. बुधवारी त्यांनी मुलींचा थाटात वाढदिवसही साजरा केला. मात्र, गुरुवारी रात्री दोन वाजता सोनालीने गळफास लावून आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. तिची एक वर्षाची चिमुकली मुलगी पायाशी झोंबून रडत होती. हे दृश्‍य पाहून अनेकांना हळहळले. काही तासांपूर्वीच चिमुकलीचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या होत्या.

(Mother-commits-suicide-by-celebrating-daughter's-birthday)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com