MPSC Recruitment : माहिती व जनसंपर्कची भरती चार वर्षांपासून रखडली जूनमध्ये झालेल्या मुलाखतीनंतर उमेदवारांना अंतिम निकालाची प्रतीक्षा

Interviews Held in June 2026 for Multiple Posts : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील गट अ आणि गट ब पदांची भरती प्रक्रिया चार वर्षांपासून रखडली आहे.
MPSC Recruitment

MPSC Recruitment

esakal

Updated on: 

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील ‘गट अ’ आणि ‘गट ब’ संवर्गातील विविध पदांची भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध होऊन तब्बल चार वर्षे लोटल्यानंतरही पूर्ण झाली नाही. जूनमध्ये काही पदांसाठी मुलाखतीही झाल्या. प्राथमिक सर्वसाधारण गुणवत्ता यादीही प्रसिद्ध झाली, मात्र अंतिम निकाल अद्याप प्रतीक्षाच आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एमपीएससीने ३० डिसेंबर २०२२ रोजी या भरतीसाठी तीन स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. पहिल्या जाहिरातीत उपसंचालक (माहिती) गट-अ वरिष्ठ या दोन पदांचा समावेश होता.

MPSC Recruitment
Pune News: एसटीच्या २५ हजार बस रस्त्यातच बंद; गेल्या चार महिन्यांतील स्थिती, पाच हजार बसची स्थिती अत्यंत खराब

दुसऱ्या जाहिरातीमध्ये वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती), जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ उपसंपादक, जनसंपर्क अधिकारी यांसह १४ पदे, तर तिसऱ्या जाहिरातीत सहाय्यक संचालक (माहिती), अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने आणि माहिती अधिकारी गट-ब यासह २६ पदांचा समावेश होता. दरम्यान, शुद्धिपत्राद्वारे दुसऱ्या जाहिरातीमध्ये १४ पैकी १२ आणि तिसऱ्या जाहिरातीमध्ये २६ पैकी २० पदे भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

त्यानंतर पुढील प्रक्रियेला विलंब झाला. दोन्ही पदांसाठी जून २०२६ मध्ये मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर दोन दिवसांत प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर झाली. मात्र, अंतिम निकाल अद्याप जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी असून, भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

MPSC Recruitment
Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

जाहिरातीनंतर अडीच वर्षांनी परीक्षा

डिसेंबर २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज केले. मात्र, परीक्षा घेण्यासाठीच तब्बल दोन वर्षे चार महिन्यांचा कालावधी लागला. अखेर १० मे २०२५ रोजी मुंबईत राज्यभरातील उमेदवारांची संयुक्त ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यानंतरही पुढील प्रक्रिया वेगाने झाली नाही. जाहिरात क्र. १३० आणि १३१साठी तब्बल १३ महिन्यांनी, जून २०२६मध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पण, अंतिम निकाल अजूनही लागला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com