दया नायकच्या खबऱ्याला कुणी संपवलं? काकाच्या मृत्यूचा २७ वर्षांनी घेतला बदला; दोघांना अटक

Mumbai Crime News मुंबईत इक्बाल सेलिया यांच्या हत्या प्रकरणी गुन्हे शाखेनं दोघांना नागपुरातून अटक केलीय. १९९९ मध्ये दादरमध्ये झालेल्या एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित वादातून ही हत्या झाल्याचं समोर येत आहे.
दया नायकच्या खबऱ्याला कुणी संपवलं? काकाच्या मृत्यूचा २७ वर्षांनी घेतला बदला; दोघांना अटक
Updated on

मुंबईत नागपाडा परिसरात झालेल्या एका हत्या प्रकरणी चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ७८ वर्षीय इक्बाल इब्राहिम सेलिया यांची हत्या करण्यात आलीय. ही हत्या २७ वर्षे जुन्या वादातून झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेनं या प्रकरणी गँगस्टर सादिक कालियाचा पुतण्या सादिक जावर आणि त्याचा साथीदार नौशाद मिठानी यांना नागपुरातून अटक केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com