तो दारूच्या नशेत ‘मी माझ्या भावाचा खून केला’ असं म्हणत पळत सुटला

Murder of brother for one hundred rupees in Nagpur Crime marathi news
Murder of brother for one hundred rupees in Nagpur Crime marathi news
Updated on

नागपूर : दारूच्या नशेत जुगार खेळल्यानंतर हरलेले १०० रुपये न दिल्यामुळे लहान भावाने मोठ्या भावाचा गळा दाबून खून केला. ही खळबळजनक घटना अंबाझरीतील सुदामनगरी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. सेवानंद रोशनलाल यादव (५०, रा. सुदामनगरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंबाझरी पोलिसांनी सेवानंदच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच हत्याकांडाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी असलेला भाऊ परमानंद यादव याने दारूच्या नशेत भावाचा खून केल्याचा गुन्हा कबूल केला असून, पोलिस त्याचे बयाण नोंदवित आहे. सेवानंद याच्या शरीरावर मारहाणच्या खुणा नव्हत्या. यादव परीवार सुदामनगरीत राहता. त्यांच्या कुटुंबात ६ भाऊ आणि ३ बहिणी असून ते आजूबाजूला राहतात.

सेवानंद हा प्लॅस्टिकचा कचरा वेचण्याचे काम करीत होता तर परमानंद हा मजुरी करतो. रविवारी रात्री दोघाही भावांनी सोबतच दारू ढोसली. त्यानंतर घरातच जुगार खेळत बसले. सेवानंद जुगारात १०० रूपये हरला. परंतु, तो परमानंदला पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे राग आल्याने परमानंदने सेवानंदचा गळा दाबला.

त्यातच त्याचा गुदमरून मृत्यू झाला. तो घरातून मध्यरात्री बाहेर आला. त्याने भावंडांना सेवानंदचा खून केल्याचे सांगत सुटला. त्यांचा भाऊ देवानंद याने अंबाझरी पोलिसांना फोन करून माहिती दिली. परमानंद दारूच्या नशेत ‘मी माझ्या भावाचा खून केला’ असे बडबडत होता.

पोस्टमार्टम रिपोर्टनंतर होईल स्पष्ट

सेवानंद याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे मारहाणीचे निशान नव्हते. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. परंतु, पोस्ट मार्टमच्या अहवालानंतर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com