esakal | बायको आणि मुलाला शिवीगाळ अन् पतीचा केला खून; पोलिसात तक्रार केल्याचा राग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बायको आणि मुलाला शिवीगाळ अन् पतीचा केला खून

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : भांडणात शिवीगाळ केल्यामुळे पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून शेजारच्या युवकाने कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. ही थरारक घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुडकेश्‍वरात घडली. देवदर्शन ऊर्फ बाळू मेश्राम (४५, रा. न्यू नेहरूनगर, पिपळा फाटा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सूरज विलास बागडे (२५) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू मेश्राम यांचा उमरेड रोडवर कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असतात. पत्नी सुलोचना (३०) आणि मुलगा-मुलगी आहे. त्यांच्या शेजारी आरोपी सूरज बागडे राहतो. त्याला दारूसोबत गांजाचे व्यसन आहे. त्याच्या स्वभावाला कंटाळून त्याची आई व बहीण वेगळ्या राहतात.

हेही वाचा: अपघाताची माहिती देण्यासाठी त्याने घरच्यांना केला फोन; मात्र

तीन वर्षांपूर्वी बाळू यांनी सूरजच्या घरासमोर टीन ठेवले होते. त्यावरून दोघांत भांडण झाले होते. सूरजने शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भयभीत होऊन बाळू मेश्राम यांनी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात सूरजविरुद्ध तक्रार दिली. यामुळे सूरज चिडलेला होता. तेव्हापासून शेजाऱ्‍यांमध्ये बिनसले होते.

शनिवारी दुपारी चार वाजता सूरजने दारूच्या नशेत बाळूची पत्नी सुलोचना आणि मुलाला शिवीगाळ केली. रात्री बाळू घरी आल्यानंतर पत्नीने झालेला प्रकार बाळूला सांगितला. त्यामुळे सूरजची समजूत घालण्यासाठी बाळू मेश्राम त्याच्या घरी गेले. त्यावेळी सूरज हा कुऱ्हाड घेऊन बसला होता. त्याची समजूत घालतानाच सूरजने शिवीगाळ केली आणि बाळू यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. त्यामुळे शेजाऱ्यांनी लगेच धाव घेतली आणि बाळू यांना रुग्णालयात नेले. बाळू यांचा उपचारादरम्यान रविवारी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. हुडकेश्‍वरचे ठाणेदार सार्थक नेहते लगेच ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. याप्रकरणी सुलोचना बाळू मेश्राम यांच्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: अधिवेशन नागपूरला होणार? विधिमंडळ सचिव १८ ला घेणार आढावा

आरोपीचे शहराबाहेर पलायन

आरोपी सूरज बागडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो गुन्हेगारांच्या टोळीशी जुळलेला आहे. त्यामुळे त्याने बाळू यांचा खून केल्यानंतर लगेच घटनास्थळावरून पळ काढला. त्याला काही गुन्हेगारांना शहरातून बाहेर पळवून लावण्यास मदत केल्याची चर्चा आहे. त्याच्या शोधासाठी हुडकेश्‍वर पोलिस रवाना झाले आहेत.

loading image
go to top