Nagpur : ॲपने कळणार एसटीचे लोकेशन; ‘एमएसआरटीसी कम्युटर ॲप’ महिलांसाठी आपत्कालीन सुविधा

‘गाव तिथे एसटी’ ही संकल्पना घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ची बस राज्याच्या कानाकोपऱ्यात धावत आहे.
s.t
s.t sakal

अखिलेश गणवीर

नागपूर - शहर असो अथवा गाव, सर्वच प्रवाशांना स्थानकात आल्यावर कधी येणार एसटी? हाच प्रश्न असतो. मात्र, प्रवाशांनो आता चिंता करू नका. यावर महामंडळाने तोडगा काढला आहे. ‘एमएसआरटीसी कम्युटर ॲप’ च्या माध्यमातून मोबाईलवर एसटी कुठे थांबली, कधीपर्यंत पोहोचेल याची इंत्यंभूत माहिती तुम्हाला कुठूनही मिळणार आहे. येत्या महिन्याभरात हे ॲप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे.

‘गाव तिथे एसटी’ ही संकल्पना घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ची बस राज्याच्या कानाकोपऱ्यात धावत आहे. गावागावांत पोहोचणाऱ्या एसटीला किती वेळ लागेल, याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. आपल्या गावात येणारी एसटी कुठे आहे. मार्गात बिघाड झाला का? सध्या कुठे थांबली आहे. याची सर्व माहिती आता प्रवाशांना मोबाईलवर लगेच कळणार आहे. महामंडळाने ‘एमएसआरटीसी कम्युटर ॲप’ विकसित केला असून, येत्या महिन्याभरात हा ॲप पूर्णक्षमतेने कार्यान्वित होऊन प्रवाश्यांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.

ॲपने कळणार एसटीचे लोकेशन

नागपूर विभागातील ४३२ बसेसमध्ये व्हीटीएस (व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम) यंत्रणासुद्धा लागली आहे.

ही मिळणार माहिती

- बस क्रमांक टाकल्यास लाईव्ह लोकेशन मिळेल.

- आपल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या स्थानकाची माहिती मिळेल.

- बस कुठे कोणत्या मार्गावर जाणार याची माहिती मिळेल.

- पर्यटन बुकिंग उपलब्ध, तिकीट आरक्षणाची सुविधा राहणार.

s.t
Nagpur : आरोग्य योजना लोकांपासून दूरच; म. फुले जनआरोग्य योजनेत पाच लाखांचा लाभ नाही

- बसची स्थिती व सेवाबाबत अभिप्राय नोंदविता येईल.

- दोष आढळल्यास चालक-वाहकांच्या तक्रारी करण्याची सुविधा.

आपत्कालीन सेवा उपलब्ध

- बसमध्ये रात्रीच्या प्रवासात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न.

- महिलांना १०० किंवा १०३ क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा.

- अपघात झाल्याची माहिती, वैद्यकीय मदत मागविता येणार.

- मार्गावर गाडी बिघाड झाल्याची माहिती मिळेल.

s.t
Chh. Sambhaji Nagar : दौलताबाद घाटात वाहतूक ठप्प; प्रवाशांना मनस्ताप, वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा

‘एमएसआरटीसी कम्युटर ॲप’ प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फायद्याचे आहे. ‘जीपीएस’मुळे बसचे लाईव्ह लोकेशन कळेल. एसटीबरोबरच बसस्थानक व मार्गाची माहिती मिळणार आहे. प्रवाश्यांचा वेळ वाचेल. लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणारा ॲप प्रवाशांकरिता सुविधेचा राहील.

- श्रीकांत गभने, उपमहाव्यवस्थापक- नागपूर व अमरावती प्रादेशिक विभाग (एसटी महामंडळ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com