Leopard Enters House in Nagpur
esakal
कोल्हापूर, सांगली आणि अहिल्यानगरनंतर आता विदर्भात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. आता नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील एका घरात चक्क बिबट्या शिरल्याची माहिती आहे. स्थानिकांनी याची माहिती पोलीस आणि वनविभागाला दिली असून वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे.