esakal | Nagpur : कसा तयार करायचा विकासाचा अहवाल ?
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : कसा तयार करायचा विकासाचा अहवाल ?

Nagpur : कसा तयार करायचा विकासाचा अहवाल ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या पाच वर्षात प्रभागात केलेल्या विकासकामांचा अहवाल तयार करण्याच्या सूचना सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी नगरसेवकांना केल्या आहेत. नगरसेवकांना विकास कामांचा अहवाल तयार करून जनतेत वाटप करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून आयुक्तांनी विकास कामे रोखून धरली आहे. त्यामुळे विकास कामाच्या अहवालात विकास दाखवायचा कसा? असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले आहे. निवडणुकीसाठी आवश्यक दारूगोळा तयार करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले. परंतु सत्ताधाऱ्यांनी यात आघाडी घेण्याचे संकेत दिले आहे.

निवडणुकीसाठी भाजपने रणनीती तयार केली असून त्यानुसार गेल्या पाच वर्षात प्रभागात झालेल्या विकास कामांचा अहवाल तयार करण्याच्या सूचना सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी नगरसेवकांना दिल्या. पाच वर्षात प्रभागात केलेली विकास कामे, नागरिकांच्या हितासाठी राबविलेले उपक्रम, राज्य सरकार, महापालिकेच्या योजनांद्वारे लोकांना केलेली मदत आदीचा संपूर्ण लेखाजोखा अहवालात मांडणे बंधनकारक आहे. येत्या दसऱ्यापर्यंत हा अहवाल तयार करून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना नगरसेवकांना करण्यात आल्या. त्यामुळे आता नगरसेवकांना गेल्या पाच वर्षांतील विकास कामांच्या, उपक्रमाची कागदपत्रे शोधून अहवालासाठी तयारी करावी लागणार आहे. परंतु पाच वर्षांतील विकास कामांचा आलेख मांडताना मागील दोन वर्षांतील विकास कामांबाबत उल्लेख कसा करायचा? या पेचात नगरसेवक सापडले आहे.

हेही वाचा: गद्दारांना तिथेच दोन लावा, पोलिस केसेसचं मी पाहतो - सुनील केदार

गेल्या दोन वर्षांपासून शहरातील विकास कामे रोखण्यात आली आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांच्या २०१९-२० या वर्षातील मंजूर कामेही अद्याप झाली नाही. त्यामुळे अहवाल तयार करताना गेल्या दोन वर्षांच्या कामाचा उल्लेख करण्यासाठी नगरसेवकांना कसरत करावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात नागरिकांची केलेली सेवेचा उल्लेख करण्याशिवाय पर्याय नाही, असे एका नगरसेवकाने नमुद केले.

१० हजार घरापर्यंत अहवाल पोहोचविण्याचे आव्हान

प्रभागातील चारही नगरसेवकांना अहवालाच्या १० हजार प्रति तयार कराव्या लागणार आहे. अर्थात एका नगरसेवकाला अडीच हजार प्रतिचा खर्च करावा लागणार आहे. हा अहवाल प्रभागातील दहा हजार घरापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान नगरसेवकांपुढे आहे. एका घरात चार सदस्य, यानुसार प्रत्येक प्रभागातील चाळीस हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती भाजपने आखली आहे.

हेही वाचा: शिवाजी पार्कचा स्वीमिंग पूल कधी सुरु होणार? महापौर म्हणाल्या...

नगरसेवकांना पाच वर्षातील विकास कामांचा अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा अहवाल दसरा ते दिवाळीपर्यंत तयार करून प्रभागात वितरित करण्यात येणार आहे. एका प्रभागासाठी अहवालाच्या दहा हजार प्रति तयार करण्यात येणार आहे.

- अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते, महापालिका

loading image
go to top