esakal | पार्टनर शोधताय? आताच व्हा सावधान! नाहीतर अडचणीत होणार वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

पार्टनर शोधताय? आताच व्हा सावधान! नाहीतर अडचणीत होणार वाढ

पार्टनर शोधताय? आताच व्हा सावधान! नाहीतर अडचणीत होणार वाढ

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी शहरात नव्याने आले असाल आणि तुम्ही सोशल मीडियावरून रूम पार्टनर शोधत असाल तर आजच सावध व्हा. तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकतो. कारण, गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक विद्यार्थी किंवा नोकरीवर असल्याचे सांगून स्वतःची ओळख लपविण्यासाठी तुमच्या रूमचा फायदा घेऊ शकतात. नुकतीच अशीच एक घटना उपराजधानीत उघडकीस आली आहे. (Nagpur-Crime-News-Crime-News-Room-Partner-Fraud-nad86)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही युवक सावज टिपण्यासाठी सज्ज असतात. काही युवक टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट असतात. ते ओएलएक्स, फेसबुक आणि अन्य सोशलमीडिया आणि ॲपवर कुणाची ‘रूम पार्टनर पाहिजे’ अशी ॲड दिसल्यास लगेच प्रतिसाद देतात. ॲड देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक आणि व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवून फोन करतात. स्वतःला एखाद्या महाविद्यालयातील विद्यार्थी सांगतात. त्यावर विश्‍वास ठेवून काही जण त्याला रूम पार्टनर म्हणून ठेवतात.

हेही वाचा: लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले!

सुरुवातीला असे युवक कॉलेजची बॅग आणि काही पुस्तके सोबत ठेवतात. त्यानंतर आठ दिवसापर्यंत नीट वागतात. जर चोरी करायची असल्यास रूममधील महागड्या वस्तू, पैसे, कपडे, लॅपटॉप, बाईक आणि मोबाईल अशा वस्तू चोरून नेतात. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर रूम पार्टनर नसून चोरटा असल्याची खात्री होते.

ओळख लपविण्यासाठी युक्ती

काही गुंड प्रवृत्तीच्या युवकावर जर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असेल किंवा पोलिस प्रतिबंधात्मक कारवाई करणार असतील तर असे युवक रूम पार्टनर म्हणून अनेकांकडे भाड्याने राहतात. गुन्हेगारी कृत्य केलेल्या वस्तीपासून लांब असलेल्या खोलीवर लपून बसतात. तसेच रात्रीच्या वेळी बाहेर निघून चोरी, घरफोडी, लूटमार किंवा गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी बाहेर निघतात. ते अटक झाल्यानंतर सोबत राहणारा विद्यार्थी मात्र अडचणीत येतो.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

घरमालकांनी व्हावे सावध

भाडेकरू ठेवताना घरमालकांनी व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांची कसून चौकशी करावी. भाडेकरूंचे आधार कार्ड, महाविद्यालयाचे ओळखपत्र तसेच पासपोर्ट फोटो मागावा. त्यानंतर नजीकच्या पोलिस ठाण्यात जाऊन रीतसर अर्ज करावा. पोलिसांना भाडेकरूंची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

(Nagpur-Crime-News-Crime-News-Room-Partner-Fraud-nad86)

loading image