Nagpur Theft Cases: सुरक्षेसाठी साध्या वेशात ‘गुप्तहेर’, मेडिकलमधील चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी अभिनव उपक्रम

चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी आता मेडिकलमध्ये साध्या वेशभूषेतील सुरक्षारक्षक परिसरात फेरफटका मारत नजर ठेवतील.
Nagpur
Nagpur esakal

Nagpur Theft Cases in Government Hospital: मेडिकल-सुपरमध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या मोठी आहे. जागोजागी रुग्णांच्या नातेवाइकांना रोखले जाते. सुरक्षा व्यवस्था प्रचंड टाईट असते, असे दाखवले जाते, परंतु यानंतरही कधी निवासी डॉक्टरांची वाहने चोरीला जातात.

तर कधी थेट ऑपरेशन थिएटरमधून वातानुकूलित यंत्रांची कॉईल रात्री पळवून नेली जाते. कॉईल चोरीच्या घटना बरेचवेळा मेडिकल, मेयो आणि ट्रॉमा युनिटमध्ये घडल्या आहेत. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी आता मेडिकलमध्ये साध्या वेशभूषेतील सुरक्षारक्षक परिसरात फेरफटका मारत नजर ठेवतील. एकप्रकारे हे गुप्तहेराप्रमाणे काम करतील अशी माहिती पुढे आली आहे.

मेडिकलमध्ये नुकत्याच तीन वातानुकूलित यंत्राच्या कॉईल चोरीला गेल्या होत्या. यापूर्वीदेखील ट्रॉमा युनिटमधील कॉईल चोरीला गेली होती. येथे कॉईल चोरणाऱ्या चोरट्याने कॉईलच्या बाजूला असलेली तार कापली नाही. कारण बाजूची तार कापल्यास ट्रॉमात दाखल असलेल्या रुग्णांच्या जिवावर बेतणारा प्रसंग निर्माण होण्याची भीती त्याला होती. यावरून कॉईल चोरी करणारे प्रशिक्षित चोर आहेत, हे सिद्ध होते. (Latest marathi News )

हे चोर नेमके कोण याचा पत्ता मेडिकल प्रशासनाला शोधायचा आहे. अनेकदा शोध घेऊनही चोरटे पकडले जात नाही. पोलिसांना तक्रार केल्यानंतर २४ तास येथे पोलिस तैनात ठेवता येत नाही, अशावेळी साध्या वेशभूषेत सुरक्षा रक्षक मेडिकलच्या २१० एकर परिसरात दुचाकीवरून प्रसंगी पायदळ फेरफटका मारतील. हे सुरक्षारक्षक मेडिकलच्या अंतर्गत भागातही फिरू शकतील. यामुळे चोरट्यांना पकडणे सोयीचे होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Nagpur
Google AI Tech : गुगलची एआय टेक्नॉलॉजी चोरून चीनला विकत होता इंजिनिअर; अमेरिकेत झाली अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com