Crime : चोरट्यांनी काढला ठाण्यातून पळ? पोलिसांकडून सूचनापत्र दिल्याचे स्पष्टीकरण

Crime news
Crime newsesakal

नागपूर : मंदिरात चोरी करीत असताना अटक करण्यात आलेल्या चोरट्यांनी चक्क ठाण्यातून पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्यात घडल्याची माहिती असून पोलिसांकडून त्यावर सूचनापत्र देऊन सोडल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. मात्र, शुक्रवारी पोलिसांनी या आरोपींना गोंदियातील तिरोड्यातून अटक केल्याचेही समजते.

Crime news
मोठी बातमी! झेडपी, महापालिकेवर आणखी वर्षभर प्रशासकच? लोकसभा, विधानसभेनंतरच ‘स्थानिक’च्या निवडणुका

अंकित संतोष पटेल (वय २१ रा.विनकर कॉलनी मानेवाडा) व त्याचा अल्पवयीन साथीदार अशी चोरट्यांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता.४) बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या समोर शिव मंदिर आणि गणपतीसह पाच मंदिरे आहेत. गुरुवारी अंकीतसह त्याचा साथीदार दुपारी गणपती मंदिरात चोरी करण्यासाठी शिरला.

अंकीतने दानपेटी फोडली आणि पैसे काढून पळत असताना त्याची जबाबदारी सांभाळत असलेले संदीप राधेश्याम बडवाईक (वय १९) यांनी बघितले. त्यांनी बेलतरोडी पोलिसांना माहिती देताच, बिट मार्शलने दोघांना पकडून पोलिस ठाण्यात आणून डीबी पथकाच्या स्वाधीन केले.

डीबी पथकाने केलेल्या चौकशीदरम्यान अन्य एक अल्पवयीन साथीदार विजेंद्र (बदललेले नाव) सोबत असल्याचे दोघांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी विजेंद्रचा मोबाइल क्रमांकही पोलिसांनी मिळवला.

Crime news
'तो' क्षण पुन्हा आला! 70 वर्षांची वधु अन् ७२ वर्षांचा वर; धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा

मात्र, त्यानंतर काही तासात आदित्य व त्याचा साथीदाराने ठाण्यातून पळ काढला. आरोपी अचानक दिसेनासे झाल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. शुक्रवारी दुपारी विजेंद्रचे मोबाइलचे लोकेशन मिळाले. त्यातून तो रेल्वेत असल्याची माहिची समोर आली.

वेळेनुसार त्यांनी ती महाराष्ट्र एक्सप्रेस असल्याची माहिती घेत, पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांची मदत घेतली. यावेळी तिघांनाही तिरोडा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. सांयकाळी उशिरा बेलतरोडी पोलिसांनी तिरोडा गाठून तिघांसह एका अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेत नागपुरात आणले.

Crime news
Ajit Pawar: आघाडीत बिघाडी? अजित पवार म्हणाले, आता विषय संपला...

सूचनापत्र दिल्याचे स्पष्टीकरण

बेलतरोडी ठाण्यातून चोरटे पसार झाल्याने याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी ते पसार झाले नसून त्यांना केवळ सूचनापत्र देऊन सोडण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. याशिवाय त्यांनी चौकशीसाठी विजेंद्र हवा होता. त्यामुळे त्याचे लोकेशन काढण्यात आले. तिघांचीही चौकशी सुरू आहे. अंकित व त्याच्या साथीदारांना पलायन केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोण खरे

एकीकडे बेलतरोडीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक केवळ सूचनापत्र दिल्याचे सांगत असताना, दुसरीकडे तिरोडा आणि इतर विभागाला चोरीच्या आरोपीला अटक करण्याची सूचना का देण्यात आली? हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे, अंकित व त्याच्या साथीदाराला सूचनापत्र देऊन सोडले तर पुन्हा मग चौकशीसाठी ताब्यात का घेण्यात आले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com