

Retired Airforce Officer Trapped in Fake Investment Scheme
Sakal
नागपूर : गुंतवणूक केल्यावर दरमहा ५० ते ६० हजार रुपये पेन्शन मिळण्याचे आमिष दाखवित, सायबर चोरट्यांनी शहरातील प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ६४ वर्षीय एअरफोर्सच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ८९ लाख रुपयांनी गंडा घातला. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी चोरट्याविरोधात फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.