कोराडी वीज केंद्राचा ‘ॲशपॉड’ फुटला; नागपूर-कोराडी मार्गही बंद

Nagpur Lake Marahi News
Nagpur Lake Marahi NewsNagpur Lake Marahi News

कामठी (जि. नागपूर) : २०१५ मध्ये ६५ कोटींची खर्च करून बांधण्यात आलेला कोराडी वीज केंद्राच्या राख तलावाचा बांध शनिवारी (ता. १६) फुटला. यात खसाळा, उप्पलवाडी व कवठा म्हसाळासह अनेक गावे पाण्यात असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. निकृष्ट बांधकामामुळे बांध फुटल्याचा आरोप होत आहे. तर या मार्गावरील रेल्वे मार्गही बंद करण्यात आला.

मागील काही दिवसांपासून नागपूर (Nagpur) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिसरातील नदी, नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. खसाळा येथे २०१५ पासून ६५ कोटी खर्च करून हा राख बंधारा बांधण्यात आला. याचे कंत्राट अभी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या कंपनीने निकृष्ट बांधकाम केल्याने या बंधाऱ्यात अनेक ठिकाणी तळे गेले होते, असा आरोप आहे.

Nagpur Lake Marahi News
चार लग्नं, एकीचा मृत्यू तर तिघींचे पलायन; त्रस्त नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

आज अखेर अतिवृष्टीने पाण्याची पातळी वाढल्याने हा बंधारा फुटला. खसाळा, मसाळा, खैरी, कवठा गावांमध्ये याचे पाणी शिरले आहे. या परिसरातील वीटभट्टी, शेतीचा परिसर जलमय झाला, तर नागपूर- कोराडी रेल्वेमार्ग बंद करण्यात आला आहे.

Nagpur Lake Marahi News
चंद्रशेखर बावनकुळेंचा वडेट्टीवार, भुजबळांना सल्ला; काही काळ शांत बसा...

खसाळा राख बंधारा ३४१ हेक्टर क्षेत्राचा असून सुमारे ७ किलोमीटर आतील जागेत राख साठवण करण्यात येते. दुपारी साडेतीनच्या सुमारास पाण्याचा विसर्ग कमी झाला. पाण्याचा विसर्ग थांबविण्यासाठी वीज केंद्राकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

ग्रामस्थांनी केली होती कंत्राटदाराची तक्रार

अभी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे यांचे कंत्राट आहे. या कंपनीने निकृष्ट बांधकाम केल्याने या बंधाऱ्यात अनेक ठिकाणी तळे गेले होते. याची तक्रार परिसरातील सरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी महाजेनको कोराडी व खापरखेडा पॉवर प्लांटचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना केली होती, असे सांगण्यात येते. प्रकल्प अधिकारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.

जिल्हाधिकारी, आमदार बावनकुळेंकडून पाहणी

या घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule), जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले, तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, पंचायत समिती सभापती उमेश रडके, खैरी ग्रामपंचायतचे सरपंच बंडू कापसे, कवठा ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण सिरसाम,खसाळा ग्रामपंचायतचे सरपंच रवी पारधी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. महाजनकोकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार बावनकुळे यांनी दिले.

Nagpur Lake Marahi News
चंद्रशेखर बावनकुळेंचा वडेट्टीवार, भुजबळांना सल्ला; काही काळ शांत बसा...

अधिकाऱ्यांची बनवाबनवी

राख तलाव (Lake) ‘ओव्हर फ्लो’ झाल्यामुळे पाण्याचा नाल्याद्वारे विसर्ग होत असल्याची बनवाबनवी सुरुवातीला कोराडी वीज केंद्रामार्फत करण्यात आली. वीज केंद्राचे मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी तातडीने राख तलाव स्थळी पोहोचले. मात्र, राख बंधाऱ्यातून दुपारी १० वाजेपासून पाण्याचा विसर्ग वाढतच होता. याला नैसर्गिक आपत्ती भासवून संबंधित गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा तातडीने देण्यात आला. मात्र, तलावाचा बांध फुटल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांची बनवाबनवी उघडकीस आली.

राख मिश्रित पाण्याचा आरोग्य, पर्यावरणावर परिणाम

कोराडी वीज प्रकल्पाजवळील खसाळा राख बंधारा फुटल्याने लाखो टन राख वाहून गेली. यामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. ही राख जवळच्या कन्हान नदीतून वाहून जाईल. यामुळे शहराला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. राखेमुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. खसाळा येथील शेती व वस्ती पाण्याखाली गेली आहे. राख वाहून गेल्याने नदी, नाले व नळयोजनेवर होणार आहे. शेकडो एकरमध्ये ही राख ठेवण्यात आली होती.

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा - राष्ट्रवादी काँग्रेस

कोराडी वीज प्रकल्पाजवळील खसाळा राख तलावाचा बांध फुटल्याने राख वाहून गेली आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी या भागातील सर्व गावांना तत्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महानिर्मितीने स्वतः युद्ध स्तरावर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण चंद्रशेखर यांनी केली आहे.

गावांना दिला सतर्कतेचा इशारा

राख बंधाऱ्यातून दुपारी १२ वाजेपासून ‘ओव्हरफलो’ पाण्याचा विसर्ग वाढतच आहे. नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता संबंधित गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा तातडीने देण्यात आला आहे. वीज केंद्र प्रशासन आणि जिल्हा प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे,असा दावा कोराडी वीज केंद्राकडून करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com