Nagpur : खट्याळपणातून नेटकऱ्यांना हसविणारी ‘सोटी पोरगी’

विनोदी मालिकातून मनोरंजन; युट्यूबवर ४६ हजारांवर फॉलोअर्स
राज्यनाट्य स्पर्धा
राज्यनाट्य स्पर्धाsakal

नागपूर : कुणाच्या टॅलेंटची कदर नाही रे... नागपूरचे कलावंत म्हणजे फक्त राज्यनाट्य स्पर्धा... असा कलावंत मुंबईत स्थिरावणार का..? अशा टोमण्यांना येथील कलावंतांनी आपल्या कतृत्वातून चोख उत्तर दिले आहे. विविध पात्र रंगविणारी, भिंगाचा आणि गोड आवाजाचा वापर करीत सोशल मीडियावर चाहत्यांना हसविणारी, विनोदाची जाण असणारी ‘सोटी पोरगी’ अर्थात निधी देशपांडे यापैकीच एक.

गेल्या सहा वर्षांपासून सोशल मीडियावरील या खास शैलीतील व्हिडीओतून नेटकऱ्यांना निधी हसविते. तिने मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत शहरातील रायसोनी महाविद्यालयामध्ये काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले.

मात्र, लहानपणीच शालेय स्तरावरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रंगमंचावर एंट्री घेणाऱ्या निधीचा ओढा कला अन्‌ अभिनयाकडे जास्त होता. नोकरी करता-करता तिने ‘डार्लिंग-डार्लिंग’ हे व्यावसायिक नाटकही केले. पुढे लग्नानंतर २०१७ साली घरबसल्या ‘सोटी पोरगी’ या पात्रासह बोबड्या शब्दात व्हिडीओ तयार केला.

निधीचा हा पहिलाच प्रयत्न प्रचंड यशस्वी ठरला. अल्पावधीतच तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या यशानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिचे पती अनिकेत देशपांडे एका प्रसिद्ध माध्यम वाहिनीमध्ये नोकरीला असल्याने या काळात

गोंडस आवाजातून हसविणारी ‘सोटी पोरगी’ निधी

कॅमेरा हँडलिंगपासून अनेक बाबींवर त्यांनी निधीची मदत केली. ‘सोटी पोरगी’ या युट्यूब चॅनेलवरील त्यांच्या या अपत्याचे आज ४६ हजारांवर फॉलोअर्स असून आजवर ३९३ व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. मराठी-हिंदी मालिका, मराठी चित्रपटातून ती झळकली आहे. तर, व्हिडीओत वऱ्हाडी भाषा वापरत वैदर्भीय छापही पाडली आहे. प्रसिद्ध अभिनेता विपुल देशपांडे तिचा भाऊ आहे.

अनेक पात्रे प्रेक्षकांना तोंडपाठ

अस्सल नागपूरकर असलेल्या निधीचे मुख्य पात्र ‘सोटी पोरगी’ यासह अंजू दीदीचं लग्न, लग्नाचा सीझन, आमच्या येथे श्रीकृपेने, मिसेस डेली सोप, ड्रायव्हिंग लेसन विथ वहिनी, बिंदीया ऑनलाइन शॉप अशा अनेक व्हिडीओंच्या मालिका नेटकऱ्यांना खळखळून हसवित आहेत. मनोरंजनासह निधी व्हिडीओमधून सामाजिक संदेशही देत असल्याने प्रेक्षकांना तिची कला अधिक भावते. नलू मावशी, माँटी, मेंदीवाल्या काकू, वहिनी, बिंदिया, भाग्यश्री असे अनेक पात्र प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com