Nagpur : हवेची गुणवत्ता बिघडलेलीच, पावसाने नागपूरकरांना एकच दिवस दिला प्रदूषणापासून दिलासा

पावसाने हजेरी लावल्यानंतर उपराजधानीतील हवेची गुणवत्ता सुधारली असे वाटत होते.
Nagpur news
Nagpur newsesakal

नागपूर : पावसाने हजेरी लावल्यानंतर उपराजधानीतील हवेची गुणवत्ता सुधारली असे वाटत होते. मात्र, गेल्या दोन दिवसात हवेची गुणवत्ता मागील आठवड्याच्या तुलनेत बिघडली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १५०० च्या वर धोकादायक स्थितीत गेलेला दिसला. हा निर्देशांक काढण्यासाठी वातावरणातील चार प्रदूषकांचे प्रमाण मोजले जाते.

Nagpur news
Thyroid Control Tips : थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टीप्सची घ्या मदत

मागील आठवड्यात १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान, हवेची गुणवत्ता २०० पेक्षा कमी झाली होती. आता मात्र, त्यात पुन्हा वाढ झाली असून चारही ठिकाणी हवेची गुणवत्ता ३०० च्या जवळपास आहे. महाल येथील हवेची गुणवत्ता ३१५ च्या आसपास आहे.

Nagpur news
Mental Health Tips : दिवसभरातील ताण-तणावानंतर स्वत:ला असे करा रिचार्ज, करा 'या' अ‍ॅक्टिव्हिटी

बुधवारी सकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली आहे. संध्याकाळपर्यंत तो १७७ ते २०१ पर्यंत खाली घसरला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला एक्यूआय वाईट श्रेणीत पोहोचला होता; पण अचानक पाऊस पडल्यामुळे मुंबईतही हवेची गुणवत्ता किंचित सुधारली आहे.

Nagpur news
Share Market Tips: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

वाहनांचे प्रदूषण, कारखान्यांमधून निघणारा धूर, रस्त्यावरील व बांधकामाच्या ठिकाणी उडणारी धूळ हे या प्रदूषकांचे स्रोत आहेत. हे प्रदूषक कण हवेत विखुरले जात नाहीत (म्हणजे वाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत). हे कण हवेतच राहिल्यामुळे आपल्या श्वासावाटे ते शरीरात जातात. आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय धोक्याचे आहे.

हवा गुणवत्ता निर्देशकांची श्रेणी

० ते ५० चांगली

५० ते १०० समाधानकारक

१०० ते २०० मध्यम प्रदूषित

२०० ते ३०० खराब

३०० ते ४०० अतिशय खराब

४०० ते ५०० गंभीर परिस्थिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com