Nagpur Flood : दोन दिवसांपासून काचिपुरा उपाशी घराघरात पाणी ,वस्तू शिल्लक नाही,झोपायला जागा नाही

कचिपुरा झोपडपट्टी अधिकृत आहे. जवळपास सर्वच रहिवासी हातमजूर आहेत.
nagpur
nagpursakal

नागपूर - शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका काचिपुरा झोपडपट्टीला बसला. सुमारे दीडशे घरांच्या झोपडपट्टीतील रहिवासी दोन दिवसांपासून उपाशी आहेत. एवढेच नव्हे तर गाद्यांपासून सर्वच साहित्य ओले चिंब झाल्याने झोपयाचीसुद्धा सोय राहिली नाही.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त वस्त्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत या वस्तीत प्रशासनाचा एकही माणूस पोहोचला नव्हता. झोपालयालाही जागा नसल्याने अनेकांनी धमरपेठ कॉलेजच्या आवारात आसरा घेतला आहे.

दोन दिवसांपासून काचिपुरा उपाशी

कचिपुरा झोपडपट्टी अधिकृत आहे. जवळपास सर्वच रहिवासी हातमजूर आहेत. वस्तीच्या शेजारून नागनदी वाहते. ढगफुटी सदृष्य पावसाने शुक्रवारी मध्य रात्री अचानक खळबळ उडाली. डोळ्यासमोरून सिलिंडर, घरातील भांडी-कुंडी वाहत होते. तोपर्यंत कमरेभर पाणी वस्तीत जमा झाल्याने कोणाला बाहेरही पडता येत नव्हते. दोन दिवस उलटूनही या वस्त्यात चिखलाचे साम्रज्य आहे. महापालिकचे पथक पाणी काढायलासुद्धा येथे फिरकले नाहीत. पुरात जे काही वाचले त्याचे गाठोडे बांधून लोकांनी रस्त्यावर आणून ठेवले आहे.

nagpur
Nagpur flood : वस्त्यांमध्ये सुतकी वातावरण, मनामनात धडकी!
nagpur
Chh. Sambhaji Nagar : पाणीपुरवठ्यातील विघ्न कायम;वीजपुरवठा खंडित झाल्याने पुरवठा पुन्हा विस्कळित

मुलासाठी फक्त एक गादी द्या

या वस्तीतील एका महिलेचे बाळ फक्त सव्वा महिन्याचे आहे. तिच्या घरातील अन्नधान्यासह सर्वच साहित्य ओलेचिंब झाले आहे. त्यामुळे मुलाला कुठे झोपवावे असा पेच त्याच्या आईला पडला होता. सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी या वस्तीला भेट दिली. तेव्हा त्या आईने खायल्या देण्याऐवजी मुलाला झोपण्यासाठी एक गादी आणून देण्याची विनंती. तिची मागणी पवार यांनी तत्काळ पूर्ण केली. मात्र वस्तीतील दीडशे घरातील नागरिकांना खाण्याचा व झोपण्याचा प्रश्न कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com