दीक्षाभूमीवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करा : डॉ. नितीन राऊत

स्वतःच्या जिविताच्या रक्षणासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, प्रशासनाला शिस्त राखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले
nitin raut
nitin rautsakal

नागपूर : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे निर्बंध लावण्यात आले आहे. दोन डोस घेतलेल्या अनुयायांना सध्या दीक्षाभूमीवर दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांचे स्वागत आहे. मात्र त्यांनी स्वतःच्या जिविताच्या रक्षणासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, प्रशासनाला शिस्त राखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

आज गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमिवर त्यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिला अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला आहे. मात्र सलग दुसऱ्‍या वर्षीही हा सोहळा होत नसल्यामुळे अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर उद्या येण्याची शक्यता आहे.

तथापि, कोरोनाच्या सावटात आलेल्या या सोहळ्याला स्वयंसुरक्षेसाठी कोविड प्रोटोकॉल पाळावा, गर्दी टाळावी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना शक्यतो आणू नये, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे. तत्पूर्वी त्यांनी दीक्षाभूमी परिसरात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सदस्यांसह प्रशासनातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत उद्याच्या आयोजनासंदर्भात बैठक घेतली.

nitin raut
मंत्री जितेंद्र आव्हाडांना मारहाण प्रकरणात अटक: किरीट सोमय्या

या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर., पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, ट्रस्टी विलास गजघाटे, नामदेव सुके, विशेष पोलिस महानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व पोलिस अधिकारी सहभागी होते. सामान्य नागरिकांना कोणतीच अडचण जाणार नाही, तसेच त्यांच्या आरोग्यालाही धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

१० वर्षाखालील व ६५ वर्षावरील बालकांना प्रवेश नाही

दीक्षाभूमीवर येताना दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तसेच कोणते तरी ओळख पत्र जवळ बाळगावे. प्रशासनाने कोरोना अधिक असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी न येण्याचे आवाहन केले आहे. दीक्षाभूमीवर शुक्रवारला फक्त दोन- डोस घेतलेल्यांनाच तपासणीअंती प्रवेश दिला जाणार आहे. ६५ वर्षावरील ज्येष्ठांना तसेच दहा वर्षाखालील बालकांना दीक्षाभूमी परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. आजारी व्यक्ती, गरोदर महिलांनी न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दीक्षाभूमी परिसरात मुक्काम करता येणार नाही. खाद्यान्न वाटप स्टॉल, मोफत अन्नदान प्रतिबंधित करण्यात आले आहे. या शिवाय या परिसरात पुस्तक,मूर्त्यांचे स्टॉल, लावले जाणार नाही. आज दीक्षाभूमी परिसरात लसीकरण केंद्रावर हजारो नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. नागरिकांनीदेखील शिस्तीत दीक्षाभूमीला भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com