Nagpur Food Price Hike : सणासुदीत गृहिणींच्या बजेटला दरवाढीचा फटका तांदूळ ६ ते १०, डाळी १० ते १५ रुपयांनी महागल्या

Tur Dal Price Rises From ₹118 to ₹128 Per Kg : तूरडाळ ११८ वरून १२८ रुपये, तर तांदळाच्या विविध प्रकारांच्या दरात किलोमागे ६ रुपयांपर्यंत वाढ झाल्याने गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला आहे.
Nagpur Food Price Hike

Nagpur Food Price Hike

esakal

Updated on

नागपूर : महागाईच्या झळांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता ऐन सणासुदीत सर्वच डाळी, तांदूळ आणि गव्हाच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे.

नवरात्रोत्सवानंतर दिवाळीचा सण तोंडावर आला असताना जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे नागरिकांच्या खर्चात आणखी भर पडली आहे. साखरेच्या वाढत्या दरानंतर आता धान्य आणि कडधान्यांची भाववाढ झाली आहे.

पावसाचा लहरीपणा, उत्पादनात झालेली घट आणि वाढलेले वाहतूक खर्च यामुळे दरावर परिणाम झाला आहे. कार्पोरेट कंपन्यांनी धान्यांचा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे बाजारात धान्याची टंचाई आहे. परिणामी, मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झालेली आहे.

Nagpur Food Price Hike
Compassionate Appointment : सुनेच्या पगारातील २५ टक्के रक्कम सासुला द्यावी लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

त्यात सणासुदीत मागणी वाढली आहे. पूर्वी ४८ ते ६० रुपये किलो असलेला तांदूळ आता ५२ ते ६७ रुपये किलोवर पोहोचला आहे. तूरडाळीच्या ठोक दरातही वाढ झाली आहे. ११८ रुपये किलो असलेली तूरडाळ आता १२८ रुपयांवर गेली आहे.

हरभरा डाळ ७६ रुपयांवरून ८३ रुपये किलो झाली आहे. हरभऱ्याच्या दरातही किलोमागे सहा रुपयांची वाढ होऊन तो ७६ रुपयांवर पोहोचला आहे. मसूर, मटकी, वाटाणा, मूग आणि मूगमोगर या कडधान्यांच्या दरातही किलोमागे तीन ते चार रुपयांची वाढ झाली आहे.

साबुदाण्याच्या दरात किलोमागे सुमारे २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे घरखर्चाचा ताळमेळ साधण्याचे आव्हान सर्वसामान्य नागरिकांसमोर उभे ठाकले आहे.

"कडधान्य, तुरडाळ आणि हरभरा डाळीचा तुटवडा आहे. सणासुदीच्या तोंडावर मागणी वाढल्याने तांदळासह तुरडाळ, हरभरा डाळीसह कडधान्याचे भाव वाढले आहे. अजून भाव वाढण्याची शक्यता आहे."

- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष,

नागपूर किरकोळ व्यापारी संघ

Nagpur Food Price Hike
Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

धान्य पूर्वीचा दर आताचा दर

तूर डाळ ११८ १२८

हरभरा डाळ ७६ ८२

तांदूळ श्रीराम ६० ६५

एचएमटी ५२ ५८

बीपीटी ४८ ५४

तुकडा तांदूळ २९ ३५

हरभरा ७० ७६

मटकी ९८ १०२

वाटाणा ५२ ५६

मूग ४९ ५३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com