Fraud news
Fraud news esakal

Nagpur News:लॉकरमधील पैसे सोंटू पाठविणार होता दुबईला? पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचाही होता इरादा

ऑनलाइन गेमिंगद्वारे व्यापाऱ्याची कोट्यवधीने फसवणूक करणारा सोंटू ऊर्फ अनंत नवरतन जैन याचे तीन बँक लॉकर गोठवूनही त्याने मित्राच्या साहाय्याने आणखी एक लॉकर उघडलं आणि आपल्या लॉकरमधील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला.

Online Gaming Fraud:ऑनलाइन गेमिंगद्वारे व्यापाऱ्याची कोट्यवधीने फसवणूक करणारा सोंटू ऊर्फ अनंत नवरतन जैन याचे गोंदियातील ॲक्सिस बॅंकेतील तीन लॉकर गोठविले होते. तरीही त्याने तेथील व्यवस्थापकाच्या मदतीने डॉक्टर मित्राच्या नावे नवे लॉकर उघडून, त्यात पैसा वळविला. हा संपूर्ण पैसा दुबईला ट्रान्सफर करण्याच्या तयारीत सोंटू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सोंटूकडे टाकलेल्या छाप्यानंतर बॅंकेला २६ जुलैला पोलिस आयुक्तांनी पत्र पाठवून त्याचे गोंदियातील ॲक्सिस बॅंकेत असलेले तीन लॉकर गोठविण्याची सूचना केली. त्यानुसार ती खाती गोठविण्यात आली.

यादरम्यान सोंटूने बॅंकेचे व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल यांना फोन करीत त्यांना शहरातील रेडिओलॉजीस्ट गौरव बग्गा यांच्या नावाने तीन नवे लॉकर उघडून, त्यात गोठविलेल्या लॉकरमधील पैसा आणि सोने वळविण्यास सांगितले. यासाठी त्याला चार कोटी देण्याचेही मान्य केले. १ ऑगस्टला त्याने ही रक्कम व सोने सोंटूच्या लॉकरमधून बग्गाच्या लॉकरमध्ये वळते केले.

याची माहिती मिळताच पोलिसांनी २० ऑक्टोबरला सकाळी गोंदियात सात ठिकाणी छोपे टाकून, डॉक्टर गौरव बग्गा यांच्या घरातून १ कोटी ३५ लाख रोख आणि तीन किलो २०० ग्रॅम सोन्याचे बिस्कीट जप्त केले. त्यानंतर धीरज उर्फ बंटी कोठारी यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे तीन किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केले. ही रक्कम जवळपास साडेपाच कोटी रुपयांच्या घरात आहे. (Latest Marathi News)

Fraud news
Baba Maharaj Satarkar : अन् वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाची चाल गायली..विठूभक्तीची शेकडो वर्षांची परंपरा जपणारे बाबा महाराज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com