

Nagpur Ganeshotsav 2026
esakal
नागपूर: गणेशोत्सव मंडळांची परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महापौर नीता ठाकरे यांनी ‘एक खिडकी’ (सिंगल विंडो) योजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका, नासुप्र, पोलिस, वाहतूक व धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत सर्व ना हरकत प्रमाणपत्रे व परवानग्या ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.