Nagpur Ganja Seized: शेणखताच्या पोत्याच्या आड गांजाची तस्करी, डीआरआयची धडक कारवाई, तब्बल ८० किलो गांजा जप्त

ट्रकमधून शेणखताच्या पोत्याच्या आड दोन कोटींच्या गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला ट्रकसह महसूल गुप्तचर संचलनालयाच्या (डीआरआय) पथकाने अटक केली.
Nagpur Ganja Seized: शेणखताच्या पोत्याच्या आड गांजाची तस्करी, डीआरआयची धडक कारवाई, तब्बल ८० किलो गांजा जप्त

Nagpur Marijuana worth 2 Crore Seized: ट्रकमधून शेणखताच्या पोत्याच्या आड दोन कोटींच्या गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला ट्रकसह महसूल गुप्तचर संचलनालयाच्या (डीआरआय) पथकाने अटक केली. बोरखेडी टोलनाक्यावर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे डीआरआयच्या पथकाने तब्बल चार वर्षानंतर गांजाची सर्वात मोठी कारवाई करून बोरखेडी परिसरात सापळा रचून दोन हजार ८० किलो गांजा जप्त केला होता. माहिती मिळताच डीआरआय विभागाच्या पथकाने बोरखेडी टोलनाक्यावर सापळा रचून ट्रकला अडविले.

ट्रकमध्ये एक कोटी ९५ लाख १० हजार रुपये गांजा सापडला. आरोपी शंकर (४५) रा. विशाखापट्टणम याला अटक करून मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
शंकरने आध्रप्रदेशातून निघालेल्या ट्रकमध्ये शेण खताच्या पोत्यात पॅकेटमध्ये गांजा ठेवला. उत्तर प्रदेशात गांजा पोचविण्यासाठी ट्रक निघाला. (Latest Marathi News)

तस्करांचा ट्रक बोरखेडी येताच सापळा लावलेल्या डीआरआयच्या पथकाने त्याला अडविले. ट्रक चालक शंकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, तो सहकार्य करीत नव्हता. ट्रकची झडती घेतली असता त्यात शेणखताचे पोते दिसले. पोते उचलून पाहिले असता गांजाचे पॅकेट आढळले.

Nagpur Ganja Seized: शेणखताच्या पोत्याच्या आड गांजाची तस्करी, डीआरआयची धडक कारवाई, तब्बल ८० किलो गांजा जप्त
"कुणाला सांगता म्हतारा झालो... तुम्हाला काय ठाऊक आहे अजून..." निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवारांचा Video चर्चेत

म्हणून सूत्रधार सापडत नाही
ओडिशा आणि आध्रप्रदेशात गांजाची मोठ्या प्रमाणावर शेती करण्यात येते. येथूनच देशभरात गांजाचा पुरवठा होतो. रेल्वे आणि रस्ते मार्गाने तस्करी होते. गांजा पोहोचविणाऱ्याला एका खेपीचे दोन हजार रुपये दिले जाते. (Latest Marathi News)

त्यासाठी महिला, विद्यार्थी आणि अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो. एका शहरातून दुसऱ्या शहरात गांजा पोहचविण्याचा हा करार असतो. त्यामुळे सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकत नाही.

Nagpur Ganja Seized: शेणखताच्या पोत्याच्या आड गांजाची तस्करी, डीआरआयची धडक कारवाई, तब्बल ८० किलो गांजा जप्त
Kuwaiti Vessel in Mumbai: कूवेतहून आलेली नौका मुंबईजवळ संशयास्पदरीत्या फिरताना आढळली; तिघांची चौकशी सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com