
Sumit Thakur: कुख्यात आणि सडकछाप गुडांना सोशल मीडियावर रिल बनवण्याचा भलताच नाद सध्या लागलाय. आपल्या गुन्हेगारी कृत्यांचं उदात्तीकरण यातून केलं जातं. पण नागपुरातील एका गुंडाची रिल बनवल्यामुळं केविलवाणी अवस्था झाल्याचं नुकतंच दिसून आलं. तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्यानं रिल बनवलं होतं.