

Election officials prepare polling arrangements for the Nagpur Graduate Constituency across six districts.
esakal
नागपूर: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी सहा जिल्ह्यांत मतदान होणार असून, यासाठी अडीच हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान पथके गुरुवारीच केंद्रांवर दाखल झाली आहेत.
या निवडणुकीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे. यासाठी विभागातील सहाही जिल्ह्यांत मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.