

Nagpur
esakal
नागपूर: शहरात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या धुव्वाधार पावसामुळे अनेक रस्ते नदीसमान झाले होते. चौकाचौकात पाणी साचले होते. तर अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. सुदैवाने यात कुठलीही जीवहानी झाली नसली तरी मनपाच्या पावसाळी नियोजनाची पोलखोल पहिल्याच पावसाने केली.