

Jaripatka Gang Tension
esakal
नागपूर : मुलाचा खून करण्यात आल्याने बिथरलेल्या कुख्यात गुंड भुरूचा भाऊ रज्जाक शेख याने परिसरातील दुकानांची तोडफोड केली. अटकेतील आरोपींवर हल्ल्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकाराने जरीपटका परिसरात तणावाचे वातावरण असून टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रज्जाक शेख हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर हल्ला, जखमी करणे, प्राणघातक हल्ला यासारखे ३० गुन्हे दाखल आहेत. तो कुख्यात गुंड भुरू ऊर्फ शेख अक्रम शेख रहमान याचा भाऊ आहे. गुरुवारी त्याचा मुलगा आबिद ऊर्फ आबू रज्जाक शेख याच्यावर १० आरोपींनी हल्ला करीत खून केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी सोहेल मोहम्मद रियाज रंगरेज (वय २०), मनीष मनोज वैष्णव (वय १९), विपुल वैश्य (वय १९), नीलेश आंबुरकर (वय १९, सर्व रा. पाचपावली) यांच्यासह पाच अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. शनिवारी रात्री रज्जाकने जिंजर मॉलसमोरील दुकानांची तोडफोड केली. तसेच, आरोपींना न्यायालयासमोर सादर करतेवेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला.
रज्जाकने शनिवारी (ता. २६) परिसरात तोडफोड करीत नागरिकांना शिवीगाळ केली. त्यानंतर रविवारी (ता. २७) दुपारी तो मुंजे चौक परिसरात आला असता, त्याच्यावर लाठ्या काठ्यांनी हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्याकडे शस्त्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पोलिसांनी रज्जाकसह साथीदारांना ताब्यात घेतले. पोलिस सोमवारी खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयात सादर करणार आहेत. खबरदारी म्हणून परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.