Leopard Enters Pardi Area, Citizens Panic
esakal
नागपूरच्या पारडी भागात बिबट्या शिरला आहे. शिवनगर परिसरातील एका घरात हा बिबट्या शिरल्याची माहिती आहे. या बिबट्यानं काही नागरिकांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याचं सांगण्यात येत आहे. शहरात बिबट्या शिरल्याची महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या तिथून हे ठिकाणी केवळ १० ते १५ किमी अंतरावर आहे. दरम्यान, याबिबट्याला रेस्क्सू करण्यासाठी वनविभागाची टीमदाखल झाली असून बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलं आहे.