Nagpur : शेतकऱ्यांना त्रास दिला तर याद राखा !

मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांचा इशारा
Nagpur news
Nagpur newsesakal

मोवाड : शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत त्रास दिल्यास अथवा अडचणी निर्माण करून जाणवपूर्वक अडवणूक केल्यास हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठी आवश्यकता भासल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी व हक्कासाठी प्रसंगी आक्रमक आंदोलन करण्यात येइल. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांनी जिल्हा ग्रामीणच्या दौऱ्यादरम्यान दिला.

Nagpur news
Nagpur : शुद्ध पाण्यासाठी ‘आप’चे निवेदन

यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नरेश भोयर, मनविसेचे माजी तालुका अध्यक्ष रितेश कान्होलकर, सचिव साजिद पठाण, मोवाड शहराध्यक्ष वसंत पाटील, विजय बागडे, साहील ढोकणे, राकेश वानखेडे, देवल धुळे, अतुल खंडार, मयूर भोयर, ज्ञानेश्वर लाखे, रितीक डाहे, वैभव पराते, राकेश बारई तसेच किर्ती बोडखे यांची उपस्थिती होती. यावर्षी पावसाळा भरपूर प्रमाणात होऊन अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या शेतातील उभी पिके नष्ट झाली. सावकार, बॅंका तसेच इतर ठिकाणावरुन उसनवारीने घेतलेल्या पैशाचा भरणा कसा करावा, मुलाबाळाचे शिक्षण तसेच परिवाराचे उदरभरण कसे करावे, अशा दुहेरी अडचणीत बळीराजा अडकला आहे.

Nagpur news
Nagpur : पंधराशे विद्यार्थ्यांसाठी एकच संस्था

समोर दिवाळीसारखा सण असून अद्याप शेतमाल घरी आलेला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. गावभेटी दौऱ्यादरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांनी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी नरखेड तालुक्यातील अनेक ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी पिकविमा रक्कम व कृषी अधिकाऱ्यांमार्फत होणारा त्रास हा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले. ही बाब गांभीर्याने घेऊन लगेच आपल्या सहकाऱ्यांयासह तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठले. यावेळी नरखेड तालुका कृषी अधिकारी श्री.ठाकूर यांच्यावर शेतकऱ्यांच्या समस्येसंदर्भात जिल्हाध्यक्ष संतापले.

Nagpur news
Nagpur : कोळशाची आयात २०२५ पर्यंत थांबविणार : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक देण्यात येणारा त्रास हा कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाही तसेच त्यांना त्रास दिल्यास आक्रमक आंदोलन छेडण्यात येणार असल्यासंदर्भातील निवेदनही यावेळी कृषीअधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान सायंकाळी ४ वाजता मोवाड न.प. मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची भेट घेऊन सामाजिक कार्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना वेळोवेळी सर्वतोपरी शासकिय मदत करावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविता येईल, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com