Nagpur Fraud : आठवं लग्न करून पसार झाली 'लुटेरी दुल्हन'.. व्यावसायिकाला ५० लाखांचा चुना, गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

फेसबुकवरून ओळखी करीत, व्यावसायिकाला प्रेमाचा जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करीत, जबरदस्ती लग्न करून ‘लुटेरी दुल्हन’ने ५० लाखांचा चुना लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nagpur Fraud
Nagpur FraudeSakal

फेसबुकवरून ओळखी करीत, व्यावसायिकाला प्रेमाचा जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करीत, जबरदस्ती लग्न करून ‘लुटेरी दुल्हन’ने ५० लाखांचा चुना लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी तिने सात जणांना अशाच प्रकारे फसविले असून याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी महिलेसह नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे.

समीरा फातिमा वल्द मुक्तार अहमद, आई रेहाना जमाल, काका मौसिन अन्सारी, त्यांची पत्नी, हरीश, वसीम, वसीम शेख अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान परिसरात सुलेमान (वय ४९, बदललेले नाव) यांचा प्रॉपर्टीचा व्यवसाय आहे. ते विवाहित असून पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांना फेसबुकवर समिरा फातिमा नामक महिलेची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. ती मान्य केल्यावर समिराने मॅसेंजरवरून मोबाइल नंबर मागितला. त्यांनी क्रमांक दिल्यावर दोघेही व्हॉट्सॲपवर चॅट करू लागले.

यादरम्यान समिराने ती एकटी मुलासोबत राहत असल्याचे सांगितले. समिराने एक दिवस सुलेमान यांना भेटण्यासाठी बोलाविले. त्यांना मनसर येथील हॉटेल राजकमल येथे फिरायला नेले. यादरम्यान दोघेही एकत्र आले. वैयक्तिक क्षणांचे व्हिडीओ आणि फोटो काढून घेत, तिने सुलेमान यांना ब्लॅकमेल करीत लग्नासाठी गळ घातली. त्यांनी नकार दिल्यावर थेट नातेवाईकांसोबत घरी येऊन तमाशा केला. त्यानंतर जबरदस्तीने लग्न करण्यासही भाग पाडले.

Nagpur Fraud
Nagpur Fraud: जादा व्याजदर अन् विदेशी टूरचं आमिष पडलं महागात, १ कोटी ८४ लाखांनी फसवणूक

मात्र, काहीच दिवसात तिच्यासह नातेवाईक प्रॉपर्टीमध्ये हक्क मागू लागले. शिवाय सातत्याने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, पैशाची मागणीही करू लागले. त्यावरून त्यांनी ५० लाख रुपये वेळोवेळी दिले. मात्र, एक दिवस बिंग फुटल्याने समिरा अशाच प्रकारे पुरुषांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली. समिरासह तिचे नातेवाईकही फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहे.

फोन आला अन् बिंग फुटले

सुलेमानला समिरा धमकी देत असतानाच, १२ डिसेंबरला २०२२ ला पाचपावली पोलिसांकडून तिच्या मोबाईलवर फोन आला. यामुळे ती घाबरली. यावेळी सुलेमानने विचारणा केल्यावर तिने पोलिस ठाण्यातून फोन आल्याचे सांगितले. मात्र, ती स्वतः ठाण्यात जाते असे सांगून निघून गेली. सुलेमानने चौकशी केल्यावर तिचे लग्न झाले असून तीन महिन्यांपूर्वी तिने अमानुल्ला खान यांच्याशी विवाह केल्याची माहिती समोर आली. तिने आत्तापर्यंत सात जणांशी लग्न करून त्यांच्याकडून पैसे वसूल केल्याचीही माहिती समोर आली.

Nagpur Fraud
Nashik Fraud Crime : लग्न करून आली अन्‌ लाखोंच्या दागिन्यांसह रफूचक्कर झाली! हिरावाडीतील एकाला घातला गंडा

खोटी कागदपत्रे आणि तलाकनामा

समिराच्या नातेवाईकांना विचारणा केली असता त्यांच्या नातेवाइकांकडून हे सर्व खोट असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी दाखविलेले घटस्फोटाचे कागदपत्रही बनावट असल्याचे आढळले. त्यावर समिराच्या नातेवाइकांनी अश्‍लील व्हिडीओ आणि फोटो मुलीच्या सासरी आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिली. त्यावर समिराने ती गर्भवती असल्याची बतावणी केली. त्यानंतरही पैशाची मागणी केली हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com