Nagpur Fraud: जादा व्याजदर अन् विदेशी टूरचं आमिष पडलं महागात, १ कोटी ८४ लाखांनी फसवणूक

जादा व्याजदर, कार, विदेशी टूरचे आमिष दाखवून ट्रेडिंग सोल्यूशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी १०२ भांडवलदारांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
Nagpur Finance Fraud
Nagpur Finance Fraud Esakal

Nagpur 1 Crore 84 Lakhs Frauded Pretexting Foreign Trip: जादा व्याजदर, कार, विदेशी टूरचे आमिष दाखवून ट्रेडिंग सोल्यूशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी १०२ भांडवलदारांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींनी सर्व भांडवलदारांकडून एकूण १ कोटी ८४ लाख ६० हजार रुपये घेतले आणि पोबारा केला.

ट्रेडिंग सोल्यूशन लिमिटेडचे आरोपी चीफ मॅनेजिंग डायरेक्टर, लोहीतसिंग धरमासिंग सुभेदार (रा. किर्लोसकर वाडी रोड, बलूस, जि. कोल्हापूर), सीईओ विजय ज्योतिराम पाटील (रा. खुपीरे, ता. करबी, जि. कोल्हापूर) आणि जेनेरूल्यू व्हिचर एलएलपीचे संबंधित अधिकारी यांनी एकमत करून नागपूरच्या सक्करदरा हद्दीतील मिरे ले-आउट, भांडेप्लॉट चौक येथे ट्रेडिंग सोल्यूशन लिमिटेडचे कार्यालय थाटले.

Nagpur Finance Fraud
Lok Sabha Election 2024: सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात महायुतीची साखरपेरणी? थोपटेंच्या कारखान्याला ८० कोटींचे कर्ज मिळणार

२१ जुलै २०२१ ते १ ऑगस्ट २०२२ च्या दरम्यान तक्रारकर्त्यासह १०२ भांडवलदार ग्राहकांना जास्त व्याजदर, चारचाकी वाहन व विदेशी दौरा देण्याचे आमिष दाखविले आणि त्यांचा विश्वास जिंकला. अशा प्रकारे आरोपींनी या सर्व भांडवलदारांकडून एकूण १ कोटी ८४ लाख ६० हजार रुपये घेतले. आणि त्यांना कोणताही नफा किंवा मूळ रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारकर्त्यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Latest Marathi news)

Nagpur Finance Fraud
Viksit Bharat: मोदी सरकारचा व्हॉट्सअॅप प्रचार बंद होणार! निवडणूक आयोगाकडून 'विकसित भारत'चे मेसेज थांबवण्याचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com