Nagpur Corporation Election : महापालिका निवडणुकीचा खर्च जाणार दहा कोटींवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur municipal corporation

महापालिका निवडणुकीचा खर्च जाणार दहा कोटींवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणूक अपेक्षित असून मनपा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. तूर्तास प्रभागाच्या कच्चा आराखड्यावर काम सुरू आहे. यानिमित्त महापालिकेने खर्चाचा आढावा घेण्यास सुरवात केली. येत्या महापालिका निवडणुकीवर दहा कोटींचा खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Delhi Pollution: बांधकामांवरील निर्बंध मागे; शाळा सुरु होण्याची शक्यता

मागील २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवर साडेसात कोटींचा खर्च झाला होता. प्रती मतदार ३६ रुपये खर्च करण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांच्या काळात महागाईत वाढ झाली असून कर्मचारी, अधिकाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीचा खर्चही वाढणार आहे. महापालिकेने अर्थसंकल्पात निवडणुकीसाठी तरतूद करून ठेवली आहे.

हेही वाचा: गद्दारी सहन करणार नाही,पाडापाडीला थारा नाही : नारायण राणे

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आता स्टेशनरी, पेन, वाहनांचे भाडे, पेट्रोल, डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याशिवाय निवडणुकीत नियुक्त करण्यात येत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला. त्यामुळे यंदा निवडणुकीत नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भत्ताही वाढणार आहे. परिणामी फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीचा खर्च दहा कोटींच्या घरात जाणार असल्याचे मनपातील अधिकाऱ्यांनी नमुद केले. यंदा प्रति मतदाराचा खर्च ४५ रुपयांच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत महापालिकेने साडेसात कोटी खर्च केले. राज्यातील इतर महापालिकेचा तुलनेत हा खर्च सर्वात कमी होता.

कच्चा आराखडा महिन्याअखेर

प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करून ३० नोव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. सध्या प्रभागाच्या कच्च्या आराखड्यावर काम सुरू असून येत्या २७ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असेही एका अधिकाऱ्याने नमुद केले.

loading image
go to top