Nagpur News : चिमुकलीला हार्टअटॅक;नागपुरात विमानाचे 'इमर्जन्सी लँडिंग'

विमानातच डॉक्टरांनी मुलींवर प्राथमिक उपचार करून जीवदान दिले.
Plane-landing
Plane-landingsakal

नागपूर : विस्तारा एअरलाईन्सच्या बेंगळुरू ते दिल्ली विमानात प्रवास करणाऱ्या डॉक्टरांनी १४ महिन्यांच्या मुलीचे प्राण वाचवून समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला.

विमानातच डॉक्टरांनी मुलींवर प्राथमिक उपचार करून जीवदान दिले. पुढील उपचारासाठी विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मुलीला तातडीने किंग्सवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Plane-landing
Nashik Crime : मोबाईल चोर निघाला तडीपार गुंड; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

रविवारी बंगळुरूवरून दिल्ली जाणारी विस्तारा एअरलाइन्सची फ्लाइट यूके-८१४ मध्ये बांगलादेशच्या या मुलीची प्रकृती अचानक बिघडली. ती सियानोटिक आजाराने ग्रस्त होती. विमानात दिल्ली एम्सचे पाच डॉक्टर पुढे आले आणि प्राथमिक उपचार केले.

Plane-landing
Mumbai Local Train : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल विलंबाने !

विमान नागपूर विमानतळाच्या हद्दीत येताच इमर्जन्सी लँडिंगची विनंती केली. परवानगी मिळताच विमान उतरविण्यात आले. उपचारादरम्यान मुलीला दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला होता. हॉस्पिटलचे प्रवक्ते ऐजाज शमी यांनी सांगितले की, मुलीवर उपचार सुरू आहे. ती व्हेंटिलेटरवर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com