nagpur news
nagpur news sakal

Ngapur News : न्यायाधीशाला जीवे मारण्याची धमकी

विक्रीकर निरीक्षकाचा प्रताप ः दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर - राज्य विक्रीकर विभागात निरीक्षकाची झालेली बदली रद्द न केल्याने त्याने आपल्या साथीदारासह विक्रीकर न्यायाधिकरणातील न्यायाधीशांना चक्क १५ लाखाच्या खंडणीसह जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सदर पोलिसांनी न्यायाधीशाच्या तक्रारीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

राजकुमार दिवसे (रा. रविनगर) व प्रकाश गायकवाड (रा. जानकीनगर, हुडकेश्वर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राजकुमार दिवसे हे राज्य विक्रीकर विभागात निरीक्षक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसे यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये अमरावतीला बदली करण्यात आली.

nagpur news
Pune News : मेट्रोचे ६५ हजार, तर पीएमपीचे १३ लाख दैनंदिन प्रवासी

त्यासाठी त्यांनी रमेश भागू जैद (वय ५९ रा. रा. फ्रेण्ड्स कॉलनी) यांना बदली रद्द करण्याची मागणी केली. रमेश जैद हे राज्य विक्रीकर विभागात सहआयुक्त असून २१ ऑक्टोबर २०२२ ला त्यांची महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण नागपूर खंडपीठात त्यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

nagpur news
Akola news : प्रभारी अधिकारी आठवड्यातून दोनच दिवस हजर

दरम्यान दिवसे यांची मागणी काही कारणास्तव अमान्य केली. त्यामुळे दिवसे यांनी ११ जुलैला गायकवाड याने रमेश जैद यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. यावेळी त्याने सर्व पोलिस मला पैसे देतात, तुम्हीही पैसे द्या, असे तो म्हणाला. मात्र, काही दिवसातच त्याने पुन्हा जैद यांना फोन केला.

त्याने पुन्हा त्यांच्याजवळ त्याची बदली न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा पैशाची मागणी केली. मात्र, यावेळीही त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून त्याने त्यांच्याविरोधात माहितीचा अधिकार कार्यकर्त्याच्या माध्यमातून काही कागदपत्रे जमा केली असल्याचा संदेश पाठविला. यावेळी त्याने त्यांना १५ लाख रुपयांची मागणी करीत, ते न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

nagpur news
Nagpur Crime News : भाजी कापण्याच्या चाकूने सासूवर सपासप वार

सातत्याने धमकी देत असल्याने त्यामुळे जैद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली. या चौकशी दोघांनीही त्यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी कट रचल्याची माहिती समोर आली. त्यातून त्यांनी सदर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com