Nitin Gadakari: ‘कहो दिल से, नितीनजी फिर से’! बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत गडकरींकडून उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या हजारो समर्थकांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
Nagpur
Nagpur Esakal

Nagpur Loksabha Nitin Gadkari: नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या हजारो समर्थकांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.

संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गडकरी आणि रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यात आकशावाणी चौकात दाखल झाले. यादरम्यान, ‘कहो दिल से... नितीनजी फिर से’, ‘नागपूर का खासदार कैसा हो, नितीन गडकरी जैसा हो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांनी गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. आकाशवाणी चौकात सभेला गडकरी यांनी संबोधित केले.

सभेला खासदार कृपाल तुमाने, प्रा. जोगेंद्र कवाडे, ॲड. सुलेखा कुंभारे, आमदार आशीष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार आदींची उपस्थिती होती.

नागपूरसाठी ५४ उमेदवारांचे अर्ज दाखल

नागपूर लोकसभा मतदार संघातून आज शेवटच्या दिवशी ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण ५४ उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज १२ उमेदवारांनी १४ अर्जांची उचल केली. आतापर्यंत २५१ उमेदवारांनी ३६१ अर्जांची उचल केली. उद्या, २८ मार्च रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. ३० मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

Nagpur
Loksabha Election 2024: 'माझ्याकडे निवडणूक लढवायलाही पैसे नाहीत', निर्मला सीतारामन असं का म्हणाल्या?

अर्ज भरण्यासाठी धावाधाव

तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ होती. शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरणारे येत होते. अर्ज भरण्यासाठी वेळ संपत येत असल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात येत होती. त्यामुळे उमेदवारांची मोठी धावाधाव दिसून आली. रामटेक मतदार संघातून अर्ज दाखल करायचा असून हा इकडे नागपूर आहे, तिकडे रामटेक आहे, चला तिकडे असे शब्दही ऐकायला मिळत होते. काहींनी अंतिम क्षणी प्रवेश केला. तर काहींना वेळ संपल्याने अर्ज न भरताच परत जावे लागले.

रामटेकमध्ये ४१ जण रिंगणात

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ४१ उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. आज शेवटच्या दिवशी ३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. रामटेकसाठी आज २१ अर्जांची ९ उमेदवारांनी उचल केली. रामटेक लोकसभेसाठी १७२ लोकांनी २२६ अर्जांची उचल केली.

Nagpur
Swatantra Veer Savarkar Collection : बॉक्स ऑफिसवर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाची वाईट अवस्था; सहाव्या दिवशीच्या कमाईत मोठी घसरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com