Nitin Gadkari Loan: नितीन गडकरींच्या डोक्यावर वाढला कर्जाचा बोजा; ३३ टक्क्यांनी वाढलं कर्ज

मागील पाच वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडील चल मालमत्तेसोबत कर्जाच्या रकमेतही वाढ झाली. त्याच्याकडील चल मालमत्तेत जवळपास ५० लाखांची वाढ झाली.
Nagpur
Nagpur Esakal

Nitin Gadkari Loan: मागील पाच वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडील चल मालमत्तेसोबत कर्जाच्या रकमेतही वाढ झाली. त्याच्याकडील चल मालमत्तेत जवळपास ५० लाखांची वाढ झाली. कर्जातही ९ लाखांची वाढ आहे.

त्यांच्यापेक्षा त्याच्या पत्नीकडील कर्जाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ आहे. गेल्या पाच वर्षात त्यांच्याकडील कर्जाच्या रकमेत ३३ लाखांनी वाढ आहे. नितीन गडकरी यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर १ कोटी ६६ लाख ८२ हजारांचे कर्ज आहे. मागील निवडणुकीत ते १ कोटी ५७ लाख २१ हजारांच्या घरात होते. त्यांच्या पत्नीवर सध्या ३८ लाख ८ हजारांचे कर्ज आहे.

मागील वेळी हा आकडा ५ लाख ७ हजारांच्या घरात होता. संयुक्त कुटुंबाच्या नावे असलेल्या कर्जाच्या रकमेतही जवळपास दुप्पट वाढ आहे. सध्या ४ कोटी १७ लाखांचे कर्ज आहे. मागील वेळी हा आकडा २ कोटी ४५ लाख होता. गडकरींकडे सध्या १ कोटी ३२ लाख ९० हजार रुपयांची चल मालमत्ता आहे. त्यांच्याकडे १२ हजार ३०० रुपये रोख तर विविध बॅंकांमध्ये ४९ लाखांच्या वर रक्कम आहे.

बॉण्ड, म्युच्युअल फंड व शेअरमध्ये ३५ लाखांची गुंतवणूक केली आहे. तर ३१ लाख ८८ हजारांचे दागिने आहेत. त्यांच्या पत्नीकडे २४ लाख रुपयांचे दागिने आहेत. त्यांच्या पत्नीकडे १ कोटी २४ लाख ८६ हजार रुपयांची चल मालमत्ता आहे.

Nagpur
IPL रंगात आली असतानाच 'या' खेळाडूंना मोठा धक्का! बोर्डाने सेंट्रल काँट्रॅक्टमधून केली हकालपट्टी

मागील निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे ६८ लाख ३८ हजार रुपये किमतीची चल मालमत्ता होती. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ९१ लाख ९९ हजार रुपयांची मालमत्ता होती. ४ कोटी ९५ लाखांची अचल मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे ७ कोटी ९९ लाखांची अचल मालमत्ता आहे. गडकरींची १० प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

Nagpur
Arvind Kejriwal: केजरीवाल राजीनामा देतील की राष्ट्रपती राजवट, दिल्लीत काय होणार? हे चार मार्ग जाणून घ्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com