Nagpur : सुपरमध्ये मोफत औषधे नाहीच!

उपचाराचे गणित बिघडले ; अधिष्ठात्‍यांना केवळ २० लाख खर्चाचे अधिकार
Medicine news
Medicine newsesakal

नागपूर : सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला १० वर्षांपासून औषधं व सर्जिकल साहित्यासाठी केवळ २ कोटीचे अनुदान मिळते. मात्र शासनाच्या खरेदीच्या धोरणामुळे स्थानिक प्रशासनाला २ कोटी देखील खर्च करण्याचे अधिकार नसून यातील केवळ २० लाख रुपये वर्षभराच्या औषधं व सर्जिकल साहित्यावर खर्च करण्याचे अधिकार उरले आहेत. यामुळे केवळ लोकल पर्चेस खरेदीच्या पलिकडे औषधं खरेदी करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला नाही. यामुळे रुग्णांना औषधांसाठी खासगी फार्मसीचा रस्ता दाखवला जातो.

Medicine news
Nagpur: नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे स्थानक विकासासाठी कार्यादेश जारी; फडणवीसांनी दिली माहिती

मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विदर्भ व लगतच्या चार राज्यातील जनतेसाठी वरदान ठरले आहे.पूर्वी येथे रुग्णसंख्या कमी होती. परंतु ती आता दुप्पट झाली. दररोज हजारावर रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते. तरी असा प्रकार होत आहे. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील औषधीसह वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत करणे २०१७ मध्ये फडणवीस सरकारने घेतला होता. तो अधिकार कायम आहे. यामुळे मेडिकल, मेयोसह सुपर स्पेशालिटीचे आर्थिक गणित बिघडले. बीपीएलपासून तर सर्वच गरीब रुग्णांवर औषधांसह सर्व सर्जिकल साहित्य विकत घेण्याची वेळ आली आहे.

Medicine news
Nagpur : विदेशात मिळणार फराळातून मायेची ऊब

सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागांसह राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्वच विभागांनी औषधी, तत्सम वस्तु आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी ही हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फतच करणे बंधनकारक करण्याचा निर्णय २६ जुलै २०१७ रोजी तत्कालीन भाजप सरकारने घेतला. यामुळे औषधी व वैद्यकीय उपकरणांचे दर आणि मानक यात एकसूत्रता राहून दर्जा व गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. एकत्रित खरेदीतून पारदर्शकता येईल, असा देखावा केला होता. मात्र याचा फटका रुग्णालयांना बसला.

Medicine news
Nagpur : घरांत पाणी शिरण्याच्या घटनांत वाढ

तत्कालीन सचिवांनी मेडिकल, मेयो, व सुपर स्पेशालिटीसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील खरेदीचा निधी हाफकिनकडे वळता करण्यासाठी सूचना दिल्या. यामुळे सुपरला औषधासाठी मिळणाऱ्या वार्षिक २ कोटींमधून तब्बल १ कोटी ८० लाख रुपये हाफकिनकडे वळते करावे लागतात. उर्वरित २० लाखांमध्ये औषधांसह सर्जिकल साहित्य खरेदी करावे लागत असल्याची माहिती पुढे आली आहे.

Medicine news
Nagpur : तर ‘शिवशाही’चाही होऊ शकतो कोळसा!

२ लाख रुग्णांची नोंद

सुपर स्पेशालिटीत हृदयरोग, मेंदूरोग, किडनीरोग, युरॉलॉजी, इंडोक्रायनोलॉजी, सीव्हीटीएस या विभागात वर्षभरात सुमारे २ लाख रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचाराला येतात. त्यांना साधी साधी औषधं येथे मोफत मिळत नाहीत. यासंदर्भात प्रशासनाला विचारणा केली असता, हाफकिनकडे खरेदी प्रक्रिया असल्याने सुपरमध्ये रुग्णांसाठी आवश्यक औषध व इतर साहित्यासाठी केवळ २० लाख रुपये खर्च करण्याचे अधिकार अधिष्ठात्यांना आहेत, असे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com