

Police uncover online betting racket in Nagpur with links extending to Dubai and multiple Indian states.
sakal
-मंगेश गोमासे
नागपूर: शहर सायबर पोलिस ठाण्याने क्रिकेट बेटिंगच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा भांडाफोड केला. याप्रकरणी एका किराणा व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून ५०० रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, आता या गुन्ह्याची ‘लिंक’ दुबईपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केवळ लाखो नव्हे तर कोट्यवधीच्या घरात ही फसवणूक झाल्याची माहिती उघड झाली आहे.