esakal | Nagpur : उघडे डीपी देतायत दुर्घटनेला निमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : उघडे डीपी देतायत दुर्घटनेला निमंत्रण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दर्शन कॉलनीतील अगदी मुख्य रस्त्यावरील उघडी डीपी दुर्घटनेला निमंत्रण देत आहे. वारंवार तक्रार देऊनही कुणीच दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. डीपीची जागा बदलण्याची गरज नाही; मात्र सुरक्षित आणि योग्य उपाययोजना केली जावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

केडीके कॉलेज ते श्रीकृष्णनगर दरम्यान दर्शन कॉलनीकडे वळणाऱ्या मुख्य मार्गावरच अगदी रस्त्यावर ही डीपी आहे. वरच्या भागात ट्रान्सफार्मर आणि यावरून मुख्य वीजवाहिनी आहे. मुख्य डीपी पुरती मोडकळीस आली आहे. पूर्वी ही यंत्रणा रस्त्याच्या कडेला होती. आता सिमेंट रस्ता तयार झाल्याने डीपी अगदी रस्त्यावर आली आहे.

सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली जात नाही. खाली गवत व वेली वाढून डीपी झाकोळली गेली आहे. गवत असल्याने जनावरांचा नेहमीच वावर असतो. त्यांना कधीही धोका संभवू शकतो. वस्तीतील मंडळींना बाहेर पडण्यासाठी हाच मार्ग आहे.

हेही वाचा: गळ्यातील फासासह वाघिणीची भ्रमंती; फासामुळे मानेवर गंभीर जखम

बच्चे कंपनीला फिरण्यासाठी घेऊन जाणाऱ्यांना याच डीपीपासून जावे लागते. एखादवेळी दुर्लक्ष झाल्यास मुले डीपीकडे जाण्याचा धोका असतो. डीपीलगतच खाद्य पदार्थांचा ठेलाही लागतो. तिथेसुद्धा लाहन मुले नियमित येत असतात. पादचाऱ्यांनाही अगदी डीपीजवळून जावे लागते. यामुळे आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी केल्या. पण, कुणीही दाद देत नाही. जबाबदारी ढकलण्याचाच प्रयत्न केला जातो. या प्रकाराने नागरिक संतप्त असून प्रशासन दुर्घटनेची वाट बघत आहे काय?, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

स्थानिक रहिवाशांकडून धोकादायक स्थितीबाबत वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. पण, कुठूनच दाद मिळत नाही. सुदैवाने अद्याप दुर्घटना घडली नसली तरी धोका कायम आहे. उलटपक्षी वीज यंत्रणा रस्त्यावर आल्यापासून धोका अधिकच वाढला आहे. दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण?, एवढेतरी संबंधित यंत्रणेने स्पष्ट करावे.

-प्रवीण मेश्राम

हेही वाचा: वाघिणीची शिकार करणाऱ्या दोघांच्या मुकुटबन पोलिसांनी आवळल्या मुसक्या; दोन फरार

वेलू गेला तारांवरी

पावसाळ्यापूर्वीच विद्युत यंत्रणेला बाधा ठरणारी झुडपे, वेली दूर करण्यात येतात. झाडांच्या फांद्याही छाटण्यात येतात. परंतु, या ठिकाणी मेंटनन्सची कामेच झाली नसल्याचे भासते. वेल अगदी उंचच उंच वीजतारांपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या वेलीसुद्धा अपघाताचे कारण ठरू शकतात.

loading image
go to top