

Nagpur News
esakal
नागपूर: अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धामुळे उद्योग क्षेत्र अडचणीत सापडले आहे. केमिकलच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे रंग उद्योगाचे (पेंट इंडस्ट्री) गणित पूर्णपणे कोलमडले आहे. गेल्या दीड महिन्यांत रंगांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याने बाजारातील मागणी २५ टक्क्यांनी घटली आहे. ऐन तेजीच्या काळात रंगांचा व्यवसाय फिका पडला आहे.