

Nagpur News
esakal
नागपूर: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) किमती वाढल्याने देशात इंधन दरवाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संभाव्य दरवाढीमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक पेचामुळे शहर आणि ग्रामीण भागातील इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक पंपांवर ''नो स्टॉक''चे फलक झळकू लागले आहेत.