esakal | Nagpur : पूजाविधीचे साहित्य महागले
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : पूजाविधीचे साहित्य महागले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गणेशोत्सव आणि जेष्ठा गौरीपासून धार्मिक विधी-पूजेची रेलचेल असते. गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सजावटीसह विधीवत पूजेसाठीच्या साहित्यासाठीची खरेदीला वेग येतो. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे यंदाही बाजारात मंदी असून साहित्य खरेदीत हवा तेवढा जोश नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. इंधन दरवाढीमुळे राळ, नारळ, कापूर आणि सूपारीसह इतरही पूजेच्या साहित्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे.

शहरातील इतवारी, महाल, सक्करदरा या परिसरात उदबत्तीसह पूजेच्या साहित्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या परिसरात ग्राहकांची चांगलीच गर्दी असते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे गर्दीवर मर्यादा आल्या आहेत. तसेच अनेकांचा रोजगार अथवा काम कमी झाल्याने खरेदीचा उत्साहही मावळला आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहकांची गर्दी कमी झालेली आहे. विक्रेत्यांच्या मते दरवर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान बाजारातील वर्दळ वाढते. मागील वर्षापासून कोरोनाने या व्यवसायाला उतरती कळा आलेली आहे. ती यंदाही कायम असून व्यवसाय फक्त ७० टक्क्यावर आलेला आहे.

अतिवृष्टीमुळे यंदा कोकणातून येणाऱ्या सुपारीची किमती भलतीच महागली आहे. ३५०-४०० रुपये किलोने मिळणारी सुपारी यंदा बाजारात ५०० ते ५५० रुपये किलो झाली आहे. लोकल व मोठा ब्रॅण्ड असलेल्या उदबत्तीमध्ये मात्र किंचित वाढ झाली आहे. तर वस्त्रमाळ, आसन, धूप आदीच्या किमती स्थिर आहेत.

गणेश प्रतिष्ठापनेसाठी पूजा साहित्याचे पॅकेज बॉक्स बाजारात दाखल झाले आहेत. सुमारे ४०० ते पाचशे रुपयांपर्यंत असलेल्या या पॅकेजमध्ये हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, अष्टगंध, शेंदूर, कापूर, जानवी, उदबत्ती, अत्तर, पाच सुपारी, खारीक, बदाम, कापूस वस्त्र, फुलवात, समईवात, रांगोळी मध अशा सोळा वस्तू असतात. त्यामुळे गणेशाची प्रतिष्ठापना करताना वस्तूंसाठी ऐनवेळी धावपळ होत नाही. गणेशोत्सवात घालण्यात येणाऱ्या सत्यनारायण पूजेचे किट्ससुद्धा उपलब्ध असून त्यामध्ये सुपारीची संख्या अधिक असल्यामुळे त्याची किंमत अधिक आहे असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: Nagpur : अभियांत्रिकी व्यवस्थापनाची ‘एफआरए’ मध्ये हेराफेरी

बाजारात ग्राहकांची गर्दी वाढलेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पूजेच्या साहित्यांची मागणी अधिक आहे. मात्र, काही साहित्यांच्या दरात इंधनवाढीमुळे विक्रमी वाढ झालेली आहे. त्यामुळे पूजा महागली आहे.

राजू नरले, संचालक,

जयभवानी पूजा शॉप

वस्तू - पूर्वीचा------------- - आताचा दर

  1. नारळ - २० रुपये नग----------- -२५ रुपये

  2. राळ - २००रुपये किलो------ - ४०० रुपये

  3. सुपारी - ३५० रुपये किलो------- ५२० रुपये

  4. कापूर - १००० रुपये किलो------- १२०० रुपये

loading image
go to top