Nagpur: नागपूरकरांकडून रस्त्यांचाही 'कचरा'! दररोज फेकला जातो ७० टन, लकडगंज झोनमधील रस्ते बनले डम्पिंग यार्ड

महापालिकेकडून लोकसहभागातून स्वच्छतेसाठीप्रयत्न केले जात असताना नागरिकच रस्त्यांवर कचरा फेकत असल्याचे चित्र आहे.
Nagpur: नागपूरकरांकडून रस्त्यांचाही 'कचरा'! दररोज फेकला जातो ७० टन, लकडगंज झोनमधील रस्ते बनले डम्पिंग यार्ड
Sakal

Nagpur Poor Waste Management: महापालिकेकडून लोकसहभागातून स्वच्छतेसाठीप्रयत्न केले जात असताना नागरिकच रस्त्यांवर कचरा फेकत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरून दररोज ७० टन कचऱ्याची उचल केली जात आहे. अर्थात हा कचरा नागपूरकरांकडूनच फेकला जात असल्याने स्वच्छता सर्वेक्षणात शहर कसे पुढे येईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सतरंजीपुरा व लकडगंज झोनमधील रस्त्यांवर सर्वाधिक ८ टन कचरा तयार होत आहे. महापालिकेने घराघरातून कचऱ्याची उचल करण्यासाठी दोन

खाजगी कंपन्यांची नियुक्ती केली आहे. परंतु नागरिक रस्त्यांनाच डम्पिंग यार्ड करीत असल्याने महापालिकेची स्वच्छतेसाठी धडपड आणखी वाढली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार दहाही झोनपैकी सतरंजीपुरा व लकडगंज झोनमधील रस्त्यांवर सर्वाधिक कचरा आढळून येत आहे.

महापालिकेचे सफाई कर्मचारी दररोज या झोनमधील रस्त्यांवरून ८ टन कचरा गोळा करीत आहेत. सतरंजीपुरा झोनमध्ये इतवारी, गांधीबाग आणि भाजी मार्केट आहेत. येथील रस्त्यांची स्थिती स्वच्छतेचा विचार करता सर्वात वाईट आहे.

लकडगंज झोनमध्ये कळमना येथे मध्य भारतातील सर्वात मोठे भाजी मार्केट आहे. त्यामुळे अनेकदा दुकानदारांकडून रस्त्यांवरच कचरा फेकला जातो. यात काही वस्त्यांतील रस्त्यांवरही कचरा आढळून येत आहे. या झोनमधील दुकानदार आणि लोक रस्ते कचरामुक्त ठेवण्याबाबत गंभीर नसल्याचे

Nagpur: नागपूरकरांकडून रस्त्यांचाही 'कचरा'! दररोज फेकला जातो ७० टन, लकडगंज झोनमधील रस्ते बनले डम्पिंग यार्ड
B.R Ambedkar Death Anniversary: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कचरा फेकणाऱ्यांमध्ये आशीनगर झोनमधील नागरिकही मागे नाही. या झोनमध्येही दररोज सात टन कचरा गोळा केला जातो. दोन वर्षांपूर्वी धरमपेठ झोनमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत कचरा फेकला जात होता. आता या झोनमधील नागरिकांत सुधारणा झाल्याचे चित्र आहे.

घराघरातून कचऱ्याची उचल केली जात असली तरी महापालिकेपुढे कचरामुक्त शहर करण्याचे मोठे आव्हान उभे झाले आहे. आता नागरिक शहराच्या सीमेवर असलेल्या नाल्यांमध्येही कचरा फेकत असल्याने त्यांना आळा घालण्याचीही कसरत महापालिकेला करावी लागत आहे. (Latest Marathi News )

Nagpur: नागपूरकरांकडून रस्त्यांचाही 'कचरा'! दररोज फेकला जातो ७० टन, लकडगंज झोनमधील रस्ते बनले डम्पिंग यार्ड
Rohit Pawar: भाजपला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही! आमदार रोहित पवार यांचा आरोप, हिवाळी अधिवेशनात जाब विचारणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com