St Mahamandal : नागपूर-पुणे एसटीच्या ४० विशेष गाड्या; स्लिपर बसचा होणार फायदा

एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिल्यांदा यावर्षी स्लिपर बस दाखल झाल्याने खासगीतील अधिक प्रवासी खेचण्याकडे महामंडळाचा कल आहे.
Nagpur Bus Stand
Nagpur Bus Standsakal

नागपूर - एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिल्यांदा यावर्षी स्लिपर बस दाखल झाल्याने खासगीतील अधिक प्रवासी खेचण्याकडे महामंडळाचा कल आहे. त्यामुळे यंदा महामंडळाने दिवाळीच्या काळात नागपूर-पुणे तब्बल ४० विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीच्या काळात सर्वाधिक गर्दी पुणे-नागपूर व नागपूर-पुणे या मार्गावर असते. त्यामुळे रेल्वेगाड्यांना एक महिन्यापासून वेटिंग आहे. रेल्वेत आरक्षित बर्थ भेटत नसल्याने बहुतांश प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळतात. वातानुकूलित आणि स्लिपरची सुविधा असल्याने रेल्वेनंतर प्रवाशांची खासगी बसला पसंती असते. मात्र, वेळेवर प्रवास करणाऱ्यांना खासगी बसचे अमाप भाडे देऊन प्रवास करावा लागतो.

नागपूर विभागात यंदा शयनयान (स्लिपर) बस दाखल झाली आहे. गणेशपेठ स्थानकावरून नागपूर-पुणे अशी नियमित ही बस धावत आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने तब्बल ४० विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. शयनयान व्यतिरिक्त इतरही गाड्यांच्या नागपूर विभागातून फेऱ्या वाढविण्यात आल्या आहे.

दररोज ८ गाड्या धावणार

शयनयान बससह शिवशाही सुद्धा नागपूर-पुणे करिता धावणार आहे. ७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान ४० विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदान, खडकी पुणे येथून नागपूरकरिता बसेस सोडण्यात येतील. नागपूरवरून दरदिवशी वेगवेगळ्या वेळेनुसार बसेस धावणार आहे.

यात दरदिवशी ८ गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे माहूर, गोंदिया, वाशीम, राजुरा, पांढरकवडा, अमरावती येथे सुद्धा विभागातील आठही आगारातून जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहे.

बस स्थानकावर उसळली गर्दी

महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात मिळणारी सवलत यामुळे एसटीत गर्दी वाढली आहे. दिवाळीत गावाला व पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. दिवाळीला एक आठवडा उरला असताना एसटीत गर्दी वाढली आहे. बसस्थानक आणि बसेस गर्दीमुळे हाऊसफूल दिसून येत आहे. त्यामुळे महामंडळाला यंदा उत्पन्न चांगले होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन दिवाळीच्या काळात नागपूर-पुणे करिता यंदा ४० विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात स्लिपर बसचाही समावेश आहे. प्रवाशांची या गाडीला चांगली पसंती आहे. आठही आगारातून विविध मार्गावर जादा फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

- प्रल्हाद घुले, विभाग नियंत्रक- नागपूर विभाग, एसटी महामंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com