Ramtek Loksabha Constituency: रामटेक लोकसभेची जागा शिंदे गटाच्या हातातून जाणार ? बावनकुळेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष

रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेना सोडायला तयार नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे मन करावे, असे आवाहन केले.
loksabha Election
loksabha Election Esakal

Nagpur Ramtek Loksabha Constituency: रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेना सोडायला तयार नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे मन करावे, असे आवाहन केले.

महायुतीमध्ये काही मोजक्या जागांवरून वाद आहे. त्यात रामटेक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. युतीमध्ये हा मतरासंघ शिवसेना लाढत होती. सलग दोन निवडणुका शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी जिंकल्या आहेत. ते आता शिंदे सेनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे या जागेवर शिंदे सेनेने आपला दावा सांगितला आहे. प्राप्त माहितीनुसार भाजपाला उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना येथून लढवायचे आहे.

तसा शब्द प्रदेशाध्यक्षांनी पारवे यांना दिला आहे. यामुळे बावनकुळे हेच रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक आग्रही असल्याचे कळते. शनिवारी माध्यमांसोबत बोलताना बावनकुळे यांनी रामटेकची जागा भाजपाला द्यावी अशी मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करीत असल्याचे सांगितले. रामटेकसाठी शिंदे यांनी मोठे मन करावे. अखेर चर्चा होऊन कुणाला तरी मागे पाऊल घ्यावे लागेल असेही ते म्हणाले. (Latest Marathi news)

विदर्भातील भंडारा-गोंदिया व गडचिरोली या भाजपाच्या तर यवतमाळ-वाशीम ही जागा शिंदे यांच्याकडे आहे. अमरावती व बुलडाणाबाबत लवकर निर्णय होईल, असे सांगून बावनकुळे म्हणाले, २५ तारखेपर्यंत महायुतीच्या सर्व जागांबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महायुतीचे घटक पक्षाचे नेते व भाजपाचे वरिष्ठ नेते चर्चा करून ठरवून उमेदवार जाहीर करतील.

loksabha Election
Arvind Kejriwal : CM अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ? कथित दारू घोटाळा प्रकरणी ईडीकडून नवव्यांदा समन्स

उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

आमदार राजू पारवे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. ते भाजपात जातील त्यांना रामटेकची उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात आहे. या चर्चांना पारवे यांनी आजवर कधीच विरोध केला नाही. शुक्रवारी पारवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र रामटेकचा फैसला व्हायचा असल्याचे ते वेटिंगवर असल्याचे कळते. (Latest Marathi news)

loksabha Election
NCP News: शरद पवारांचे फोटो वापरणार नाही; अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com