Bala Rafiq Wrestling: बाला रफीकने गाजवले मैदान! ठरला ‘छत्रपती केसरी’चा मानकरी, राज्यातून ७० पहिलवान सहभागी

शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेमध्ये छत्रपती केसरी व मानाची गदा महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक यांनी पटकावली.
Bala Rafiq Wrestling: बाला रफीकने गाजवले मैदान! ठरला ‘छत्रपती केसरी’चा मानकरी, राज्यातून ७० पहिलवान सहभागी

Chhatrapati Kesari Bala Rafique: शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेमध्ये छत्रपती केसरी व मानाची गदा महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक यांनी पटकावली. पै. बाला रफीकने बंटीकुमार यास पराभूत करत मानाच्या मानाची गदावर आपले नाव कोरले. प्रथमच आयोजित स्पर्धेमध्ये विविध राज्यांतून ७० पहिलवान सहभागी झाले होते.

शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी गाडगेबाबा चौकातून छत्रपतींच्या पुतळ्याची रथामध्ये ज्ञानाई मुलींचे वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील मुलींनी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली.

ही मिरवणूक क्रांती चौकापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये राम महाराज झिंजुर्के, माजी आमदार चंद्रशेखर घुले, ॲड. प्रताप ढाकणे, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, ॲड. शिवाजीराव काकडे, अरुण लांडे आदींसह सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थिक होते. (Latest Marathi News)

क्रांती चौकात उभारलेल्या व्यासपीठावर पूर्णाकृत्री पुतळाची प्रतिष्ठापना करण्यात आली. रात्री राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी आतिषबाजी करण्यात आली. सार्वजनिक उत्सव समिती व रोटरी क्बलतर्फे शहरातील स्वराज मंगल कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर आयोजन केले. या शिबिरात १०० तरुण व महिलांनी रक्तदान केले. यावेळी शहात प्रथमच कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्याने या कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Bala Rafiq Wrestling: बाला रफीकने गाजवले मैदान! ठरला ‘छत्रपती केसरी’चा मानकरी, राज्यातून ७० पहिलवान सहभागी
Virat Kohli Deepfake Video : सचिननंतर आता किंग कोहलीही झाला डीपफेकची शिकार; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

अनिल लोणारी, मनोज पवार यांना विभागून व्दितीय बक्षीस

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने शहरातील खंडोबा मैदानावर रविवारी (ता. १८) रात्री उशिरा कुस्त्यांचे आयोजन केले होते. यामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिलेले एक लाख ५१ रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस व छत्रपती केसरी मानाची गदा महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक याने पटकाविली. (Latest Marathi News)

त्याने बंटीकुमार यास पराभूत केले. आमदार मोनिका राजळे यांनी दिलेले एक लाखांचे व्दितीय क्रमांकाचे बक्षीस पै. अनिल लोणारी व पै. मनोज पवार यांना विभागून देण्यात आले. ॲड. प्रताप ढाकणे यांनी दिलेले ५१ हजारांचे तृतीय बक्षीस सागर कोल्हे व अक्षय कावरे यांना विभागून देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस शेवगावमधील पै. ऋषिकेश जोशी यास देण्यात आले. त्याने पै. विराज सातारकर यास पराभूत केले. मल्लांबरोबर समालोचक व पंचांनी ही प्रमुख पाहुणे, आयोजक व ग्रामस्थांनी भरभरून बक्षिसे दिले. समालोचक राजेंद्र देवकाते व दीपक कुसळकर यांनी केले. पंच म्हणून संभाजी निकाळजे व गणेश दसपुते यांनी काम पाहिले.

Bala Rafiq Wrestling: बाला रफीकने गाजवले मैदान! ठरला ‘छत्रपती केसरी’चा मानकरी, राज्यातून ७० पहिलवान सहभागी
CM on Maratha Reservation: मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकण्याबद्दल मुख्यमंत्र्यांना ठाम विश्वास, राज्यांची वाचली यादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com