Nagpur: एसआरपीएफच्या जवानाने रायफलने स्वत:वर झाडली गोळी; पोलीस विभागात खळबळ

वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी येथील अपारंपरिक प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने तणावातून एसएलआर रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
SRPF Jawan
SRPF Jawan Esakal

Nagpur SRPF Jawan Ended His Life: वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी येथील अपारंपरिक प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने तणावातून एसएलआर रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.६) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मंगेश मस्की (वय ३५) असे मृतक जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो एसआरपीएफच्या ग्रुप चारचा कर्मचारी होता. सध्या तो सुराबर्डी येथील अपारंपरिक प्रशिक्षण केंद्राच्या (युओटीसी) मुख्य प्रवेशद्वारावर कार्यरत होता. आज सायंकाळी तो प्रवेशद्वारावर असलेल्या केबिनमध्ये एकटा बसला होता. दरम्यान अचानक गोळीचा आवाज झाल्याने आजूबाजूचे सर्वच कर्मचारी धावत आले.

मंगेशने रायफल मानेखाली ठेवून गोळी झाडली. गोळी डोक्यातून आरपार बाहेर निघाली. त्यामुळे जागीच मंगेशचा मृत्यू झाला. वाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे ताफ्यासह दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. दरम्यान मंगेशने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली ते कळू शकले नाही.

SRPF Jawan
Voter List:मोहम्मद अशरफ बनले श्रीकृष्ण चव्हाण! मतदार यादीमध्ये मोठा घोळ; नावासमोर भलत्याचाच फोटो, मतदारांकडून तीव्र संताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com