
नागपूर : जहाजातून प्रवास करताना नेहमीच समुद्र चाचे किंवा लूटारूंची दहशत असते. व्यावसायिक अख्खे जहाज गिळंकृत केल्यानंतरही ते सहजासहजी सापडत नाहीत. मात्र, आता समुद्रात असताना ४८ किलोमीटरच्या कक्षेत असलेल्या कोणत्याही जहाजाची माहिती काहीच क्षणात एका अॅपद्वारे मिळविता येणे शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर ते जहाज अनोळखी असल्यास अलर्टही मिळणार आहे.
देशाच्या तिन्ही सीमा या समुद्राने वेढलेल्या आहेत. समुद्राच्या सीमेतून अनेकदा विविध वस्तूंची तस्करी होत असते. अशा प्रकारचे अनेक जहाज आणि समुद्री चाचे समुद्रात फिरतात. नौदलाच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण करण्यात येत असते. मात्र, प्रवासी जहाजांना समुद्री चाचेंची मोठ्या प्रमाणात भीती असते. त्यामुळे ही समस्या लक्षात घेता ट्रिपल आयटी येथील कॉम्प्युटर सायन्स शाखेतील अंतिम वर्षात असलेला हर्षल खंडाईत, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेतील कॉम्प्युटर सायन्स शाखेतील तृतीय वर्षाचा विद्यार्थी रितिक अग्रवाल आणि इतर विद्यापीठात विविध शाखेत शिकणाऱ्या वर्ले कू, सूरज झुनझुनवाला, हनिषा एम., अभिज्ञा शास्त्री यांनी एकत्र येऊन 'नोस-टोस' या नावाच्या अॅपची निर्मिती केली. यासाठी सॅटेलाईट इमेज आणि ऑटोमॅटिक आयडेन्टीफिकेशन सिस्टम डेटा(एआयएस)ची मदत घेतली. यामुळे समुद्रात आता असताना ४८ किलोमीटरच्या परिसरातील कोणत्याही जहाजाची माहिती अॅपवर येते. त्यामुळे मोबाईलमध्ये सिग्नल मिळतो. यानंतर ते जहाज जवळ येत असताना अनोळखी असल्यास अॅप अलर्ट अलार्म देतो. या चमूने १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आलेल्या असेन-इंडिया २०२१ या आंतरराष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत सहभागी होत, त्यात मिळालेले आव्हान स्वीकारले. त्यातूनच त्यांच्या चमूने हे 'अॅप' विकसित केले. यासाठी त्यांना या स्पर्धेचे उपविजेतेपदही मिळाले. त्यांना यासाठी ट्रिपल आयटीचे डॉ. आशिष दर्यापूरकर आणि विपिन कांबळे यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे यापूर्वी हर्षलने राष्ट्रीय पातळीवरील हॅकेथॉनमधूनही आपल्या कल्पकतेची चुणूक दाखविली आहे.
काय आहे 'नोस-टोस'
'नोस-टोस' हा ग्रीक शब्द आहे. प्राचीन काळी जेव्हा समुद्राच्या प्रवासातून परत येणाऱ्यांना 'नोस-टोस' असे म्हणण्यात यायचे. त्यामुळेच या 'अॅप' 'नोस-टोस' असे नाव देण्यात आले. अॅपच्या माध्यमातून प्रवासी जहाजांना बरीच मदत मिळणार असल्याचे हर्षल खंडाईत याने सांगितले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.