नागपूर : विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा होणार ऑफलाइन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी म्हणजेच सम सत्राच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहे. यापूर्वीच विद्वत मंडळाच्या सभेत उन्हाळी परीक्षा ऑफलाइन घ्याव्या असा निर्णय झाला.
Nagpur University
Nagpur UniversitySakal
Summary

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी म्हणजेच सम सत्राच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहे. यापूर्वीच विद्वत मंडळाच्या सभेत उन्हाळी परीक्षा ऑफलाइन घ्याव्या असा निर्णय झाला.

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Nagpur University) उन्हाळी म्हणजेच सम सत्राच्या परीक्षा (Exam) ऑफलाइन (Offline) होणार आहे. यापूर्वीच विद्वत मंडळाच्या सभेत उन्हाळी परीक्षा ऑफलाइन घ्याव्या असा निर्णय झाला आहे. त्यामुळे शेवटच्या सत्रातील परीक्षा विद्यापीठाद्वारे घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे विद्यापीठाद्वारे हिवाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याचे ठरविले. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना आणखी एक ते दीड महिना शिल्लक आहे. यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला तयारीसाठी बऱ्यापैकी कालावधी मिळणार आहे. यामुळे विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे मानले जात आहे.

नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालयीन स्तरावर प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा प्रवेशाच्या अंतिम तिथीपासून ९० दिवसानंतर घेण्यात येतील. मार्चच्या सुरुवातीला पहिल्या सत्राच्या परीक्षा होतील अशी शक्यता आहे. यानंतर उन्हाळी परीक्षांना प्रारंभ होईल.

Nagpur University
अप्रशिक्षित डॉक्टरांच्या भरवशावर सेवा दवाखाने; कामगारांच्या आरोग्याशी खेळ

लसीकरणाचा फायदा

महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी १८ वर्षे पूर्ण झालेली आहेत. नागपूर विभागात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. विभागात पहिला डोज घेणाऱ्यांची संख्या ८० टक्केवर आहे. दुसरा डोज घेणाऱ्याची संख्या ५० टक्क्यापेक्षा जास्त आहे. याचा फायदा परीक्षा आयोजित करताना निश्चितच होणार आहे. याशिवाय चालू शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र ऑफलाइन सुरू झाल्याने परीक्षाही ऑफलाइन घेण्यात येणार आहे.

नियमित परीक्षांसाठी सर्व तयारी

विद्यापीठाने परीक्षेसाठी ५०-५० फार्म्युला लागू केला. त्यानुसार विषम सत्राच्या व पुरवणी परीक्षा महाविद्यालय स्तरावर तर सम सत्राच्या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षांवर संपूर्ण नियंत्रण विद्यापीठाचे राहणार आहे. यामुळे उन्हाळी परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला फारशी मेहनत करावी लागणार नाही. याशिवाय नियमित परीक्षा घेण्यासाठीची सर्व तयारी असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने अनेकदा सांगितले आहे.

दूसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे उन्हाळी परीक्षा या नियमितपणे कोरोनापूर्वी जशा व्हायच्या तशाच पद्धतीने घेण्यात येणार आहे.

- डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com