esakal | आनंदाची बातमी : विद्यार्थ्यांचे ७५ टक्के परीक्षा शुल्क होणार माफ
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदाची बातमी : विद्यार्थ्यांचे ७५ टक्के परीक्षा शुल्क होणार माफ

आनंदाची बातमी : विद्यार्थ्यांचे ७५ टक्के परीक्षा शुल्क होणार माफ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) शैक्षणिक शुल्कासंदर्भात घेतलेल्या निर्णयानुसार ७५ टक्के शुल्क माफ करण्यात (75% fee will be waived) येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या प्रमुखांची मंगळवारी या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. विद्यापीठ प्रशासनाने नेमलेल्या डॉ. मिलिंद बाराहाते समितीचा अहवाल मंजूर (Report approved) करून व्यवस्थापन समितीकडे पाठविला आहे. (Nagpur-University-to-waive-75-percent-Examination-fees-of-students)

अहवालानुसार सर्वप्रथम आगामी हिवाळी परीक्षा २०२१मध्ये विद्यार्थ्यांना फक्त २५ टक्के परीक्षा शुल्क भरावे लागले. उर्वरित ७५ टक्के विद्यापीठ माफ करणार आहे. याशिवाय महाविद्यालयांमार्फत आकारण्यात येणारे जीम, कॉलेज मॅगझिन, प्रोजेक्ट फी, युथ फेस्टिवल शुल्क माफ करण्यात येणार आहे.

हेही वाचा: प्रेयसीने दिली ‘गुड न्यूज’ अन् प्रियकराला खावी लागली तुरुंगाची हवा

महाविद्यालयांना ३९० रुपये प्रति विद्यार्थी यानुसार शुल्क विद्यापीठांना द्यावे लागते. हे शुल्कही माफ करण्यात येणार आहे. लायब्ररी आणि प्रॅक्टिकलसाठी विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क भरावे लागणार आहे. आज झालेल्या बैठकीत अभ्यासक्रमाचे पूर्ण शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागले असे ठरले. तसेच इनरोलमेंट फी, आयडी कार्ड फीससुद्धा भरवी लागणार आहे.

शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते. ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. या विद्यार्थ्यांना शुल्‍क माफीचा लाभ आधीच देण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयांमार्फत त्यांचे शुल्क माफ करता येणार नाही. जेव्हा विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होईल तेव्हा त्यांना ती महाविद्यालयात जमा करावी लागले एवढी मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा: नागपूरच्या भावेशची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद; चतुष्कोन पूर्ण

व्यवस्थापन समिती करणार शिक्कामोर्तब

विविध विद्यार्थी संघटनांच्या मागणीवरून शुल्क माफीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल व्यवस्थापन समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच विद्यापीठ व्यवस्थापन समितीची बैठक बोलवून शुल्क माफीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

(Nagpur-University-to-waive-75-percent-Examination-fees-of-students)

loading image