नागपूर : इंटेरियर डिझाइनींगमध्ये ‘शिल्प कलेचा’ वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

नागपूर : इंटेरियर डिझाइनींगमध्ये ‘शिल्प कलेचा’ वापर

नागपूर : स्वप्नवत घर बांधून झाल्यानंतर नव्या घरात आजवर फर्निचर कसे असावे, पडदे कुठल्या रंगाचे लावावे इथवरच चर्चा होत असायच्या. मात्र, नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारल्यानंतर घराची शोभा वाढविण्यासाठी इंटेरियर डिझाइनरची नेमणूक करण्याचे प्रस्थ वाढले. यामध्ये स्पर्धा निर्माण झाल्यानंतर कामांमध्ये कल्पकता देखील वाढली. नागपुरातील अवंती रामटेके या तरुणीने याच कल्पकतेचा वापर करून इंटेरियर डिझाइन एका वेगळ्या पैलूवर नेऊन ठेवले.

शिल्पकलेसह भित्तिचित्र कला (म्युरल आर्ट), कॅनव्हास पेंटिंग, डिजिटल पेंटिंग, टाकाऊ साहित्यापासून शोभेची शिल्प आदी कलेचा वापर करीत अवंतीने नागपूरकरांच्या घरांची शोभा वाढविली आहे. तीने इंटेरियर डिझाईन या विषयात पदवी आणि नंतर दोन विषयांमध्ये एमबीए पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. कुटुंबामधील कुणीही व्यावसायिक नसताना तीने या क्षेत्रात यायचे धाडस केले. कल्पकता आणि कला या विषयांमध्ये तिची असणारी ओढ तीला या क्षेत्रात घेऊन आली.

हेही वाचा: पोटच्या बाळाची हत्या करून तीने उचलंलं धक्कादायक पाऊल; मानसिक संतुलन ढासळल्याचा अंदाज

त्या अनुषंगाने तीने ॲबस्ट्रॅक्ट इंटेरियर सोलुशन कंपनीची स्थापना करीत घर, हॉटेल, कार्यालय, रिसॉर्ट कलेद्वारे अधिक खुलविण्यासाठी कलेचा आधार घेतला आहे. टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले शिल्प मुख्यत: शहरातील रेस्टॉरंटला सजविण्यासाठी तयार करण्यात येत. अवंतीच्या हटके कामांमुळे शहरातील लहान-मोठे शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार, पेंटर यांना रोजगारासह एक नवी ओळख मिळाली आहे. ही शिल्प मुंबई, पुणे, लोणावळा, हैदराबाद, बंगरूळू आदी ठिकाणी लावण्यात आली आहेत.

हेही वाचा: शाहरुखच्या गौरीनं केलं अलियाच्या घराचं इंटेरियर; किंमत फक्त 32 कोटी

इंटेरियर डेकोरेशन करताना कलेशी निगडित असणाऱ्या वस्तू घरामध्ये ठेवण्याकडे लोकांचा कल असतो, ही बाब मला संशोधन करताना जाणवली. तसेच, अनेक कलावंतांमध्ये सुप्त गुण दडलेले मी पाहिले आहेत. या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मी अशा कलात्मक वस्तू वापरण्याचा निर्णय घेतला.

- अवंती रामटेके, संचालक, ॲबस्ट्रॅक्ट इंटेरियर सोलुशन

loading image
go to top